हजर बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हजर बाजार[१] (इंग्लिश: Spot market, स्पॉट मार्केट) किंवा रोकड बाजार (इंग्लिश: Cash market, कॅश मार्केट ) म्हणजे तात्काळ पोचवणीसाठी (बटवड्यासाठी) उपलब्ध असलेल्या वित्तीय संलेखांचा किंवा वस्तूंचा व्यापार चालणारा सार्वजनिक वित्तीय बाजार होय. पोचवणीच्या दृष्टीने हा वायदे बाजारापेक्षा भिन्न असतो, कारण वायदे बाजारात भविष्यातील एखाद्या दिवशी पोचवणी अभिप्रेत असते; तर हजर बाजार तात्काळ पोचवणीच्या सौद्यांवर चालतो. हजर बाजाराच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत :

  • सुसंघटित बाजार. उदा.: रोखे बाजार.
  • गल्ल्यावरील सौदे, अर्थात ओव्हर द काउंटर (ओटीसी).

हजर बाजार व्यवहार घडण्यासाठी आवश्यक तेवढ्या पायाभूत सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी चालू शकतो. सध्या वित्तीय संलेखांचे सौदे होणारे बरेचसे हजर बाजार आंतरजालावर चालतात.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. अर्थशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, पृ. ६३१. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.