स्नेहा उल्लाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्नेहा उल्लाल
काश मेरे होते च्या मुहूर्तावर स्नेहा उल्लाल
जन्म स्नेहा उल्लाल
१८ डिसेंबर, १९८७ (1987-12-18) (वय: ३६)
मस्कत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
धर्म हिंदू

स्नेहा उल्लाल (जन्म:१८ डिसेंबर, १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.[१] ती हिंदी चित्रपट 'लकी:नो टाइम फॉर लव्ह' आणि 'उल्लासमगा उत्सहमगा', 'सिम्हा' या तेलगू चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते.[२]

प्रारंभिक जीवन[संपादन]

स्नेहा उल्लालचा जन्म मध्यपूर्वेतील मस्कत, ओमान येथे झाला. तिचे वडील मंगळूर येथील तुळू देवाडिगा आणि आई सिंधी भाषिक आहेत.[३] तिने ओमानमधील 'इंडियन स्कूल वाडी कबीर' आणि 'इंडियन स्कूल, सलालाह' येथे शिक्षण घेतले. नंतर ती तिच्या आईसोबत मुंबईला गेली, तिथे 'ड्युरेलो कॉन्व्हेंट हायस्कूल' आणि 'वर्तक कॉलेज' येथून तिने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.

अभिनयाची कारकीर्द[संपादन]

उल्लालने इ.स. २००५ मध्ये सलमान खान सोबत 'लकी:नो टाइम फॉर लव्ह' या हिंदी चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती दिसण्यात ऐश्वर्या राय सारखी हुबेहूब असल्याने चांगली चर्चेत आली. तसेच ऐश्वर्या राय सोबत तिच्या अभिनयाची तुलना देखील केल्या गेली.[४] तिने सांगितले की, जरी या तुलनेने तिला अभिनेत्री म्हणून फार मोठा फायदा झाला नाही, तरीपण त्यामुळे तिला एक ओळख मात्र मिळाली.[५] त्यानंतर उल्लाल ने सलमान खानचा भाऊ सोहेल खान सोबत 'आर्यन'मध्ये काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.

ती खूप लहान आहे आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तिला अधिक परिपक्व व्हायला हवे या भीतीने तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.[५] तिने, उल्लासमगा उत्सहमगा, या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. याच सोबत हा चित्रपट हिट देखील ठरला. 'नेनू मीकू तेलुसा...?' हा तिचा दुसरा तेलुगु चित्रपट होता. त्यानंतर नागार्जुन सोबत तेलुगु चित्रपट 'किंग' मधील नुव्वु रेडी या गाण्यात ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली.

२००७ मध्ये, ती भयपट निर्माते आणि अभिनेता 'स्टेग डॉर' यांच्या 'पायरेट्स ब्लड'मध्ये दिसणार होती. मुलाखतींमध्ये, डॉर म्हणेल "आम्ही ते चक्रीवादळामुळे रद्द केले. आम्ही ते चालू ठेवू शकलो नाही आणि वित्तपुरवठा कमी झाला." ही भूमिका नंतर ओमान अभिनेत्री मैमून अल-बालुशीकडे गेली.

नंतर तिने 'काश... मेरे होते' हा अजून एक हिंदी चित्रपट साइन केला.[५] तिचे पुढील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले नाहीत, परंतु बालकृष्णा सोबत तिचा २०१० मध्ये रिलीज झालेला 'सिम्हा' ब्लॉकबस्टर ठरला.[६]

अभिनय संचिका[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका भाषा Notes Ref.
2005 लकी:नो टाइम फॉर लव्ह लकी नेगी हिंदी पदार्पण
2006 आर्यन नेहा वर्मा हिंदी
2007 जाने भी दो यारों हिंदी
2008 उल्लासमगा उत्साहमगा धनलक्ष्मी तेलुगू तेलुगू भाषेत पदार्पण
संतोषम बेस्ट डेबू ऍक्टरेस
[७]
नेनू मीकू तेलुसा...? अंजली तेलुगू
किंग नेहा उल्लाल म्हणून तेलुगू पाहुनी कलाकार
2009 काश... मेरे होते राधिका हिंदी
करंट स्नेहा तेलुगू
2010 क्लिक आरती कौशिक हिंदी
वरूडू तेलुगू
सिम्हा जानकी तेलुगू
2011 आला मोदलंदी काव्या तेलुगू
देवी कन्नड कन्नड भाषेत पदार्पण
गांधी पार्क प्रियंका फिलिप इंग्रजी इंग्रजी भाषेत पदार्पण
मदथा काजा स्वप्ना तेलुगू
2012 मोस्ट वेलकम बंगाली पाहुणी कलाकार
2013 ऍक्शन ३डी समीरा तेलुगू
2014 अंतनी मायलोन तेलुगू
2015 बेजुबान इश्क रुमझूम हिंदी

वेब सिरीज[संपादन]

वर्ष मालिका भूमिका भाषा स्रोत
2020 एक्सपायरी डेट दिशा तेलुगू, हिंदी झी ५

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'Lucky-No Time for Love' actress, Sneha Ullal's pictures are breaking the internet". The Times of India.
  2. ^ https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/sneha-ullu-on-her-comeback-in-films-i-waited-for-this-time-when-women-are-free-1448238-2019-02-05}}
  3. ^ Mohandas, B.G. (1 May 2005). "A Bubbly Community Girl Sneha Ullal Speaks To Devadiga.Com". Devadiga. Archived from the original on 13 August 2015. 12 June 2014 रोजी पाहिले.
  4. ^ TNN (18 September 2006). "Sneha follows Aishwarya! – The Times of India". The Times of India. 12 December 2010 रोजी पाहिले.
  5. ^ a b c "Sneha on her upcoming movie". RealBollywood.com. 5 January 2009. 16 May 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Simha box office results". BollywoodRaj.com. Archived from the original on 8 July 2011. 16 May 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "Santosham film awards 2009 – Telugu cinema function". Idlebrain.com. 21 August 2009. 12 December 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]