सोनेरी वानर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनेरी वानर[१]
सोनेरी वानर.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: प्रकृष्ट
कुळ: Cercopithecidae
जातकुळी: Trachypithecus
जीव: T. geei
शास्त्रीय नाव
Trachypithecus geei
(Khajuria, 1956)
भौगोलिक आढळस्थान
भौगोलिक आढळस्थान

सोनेरी वानर ही वानरांमधील एक जात आहे ( शास्त्रीय नाव - Trachypithecus geei) ही वानरे फक्त भारत-भूतान मधील मानस राष्ट्रीय उद्यानात दिसून येतात. इतर वानरांपेक्षा ही जात अत्यंत दुर्मिळ आहे व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

नावा प्रमाणेच ह्या वानराची फर सोनेरी रंगाची असते म्हणून यास सोनेरी वानर असे म्हणतात. याची उंची साधारणपणे अर्धामीटर पर्यंत असते व वजन १०-१२ किलोपर्यंत भरते. झाडांची पाने व फळे हा यांचा मुख्य आहार आहे. इतर वानरांप्रमाणेच हेही वानर मुख्यत्वे कळप करून रहातात. कळपाचा म्होरक्या नर असतो व इतर माद्या असतात[२].

संदर्भ[संपादन]

  1. ग्रोव्ज कॉलिन (२००५). विल्सन डि.ई; रीडर डि.एम.: जागतिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, ३ री, जॉन हाफकीन्स युनिवर्सिटी प्रेस, पृ. १७६. आय.एस.बी.एन. ०-८०१-८८२२१-४. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर) 
  2. सोनेरी वानराची माहिती

बाह्य दुवे[संपादन]