सोत्शी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सोत्शी Сочи |
|||
|
|||
| सोत्शीचे रशियामधील स्थान | |||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| राज्य | क्रास्नोदर क्राय | ||
| स्थापना वर्ष | इ.स. १८३८ | ||
| क्षेत्रफळ | ३,५०५ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या (२०१०) | |||
| - शहर | ३,४३,२८५ | ||
| - घनता | ९८ प्रति वर्ग किमी | ||
| प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
सोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनार्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.
२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.
सोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |