सेंट लॉरेन्स नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सेंट लॉरेन्स नदी | |
सेंट लॉरेन्स सागरी मार्ग |
|
| उगम | ऑन्टारियो सरोवर |
| मुख | अटलांटिक महासागर |
| लांबी | १,१९७ किमी (७४४ मैल) कि.मी. |
| देश | |
| सरासरी प्रवाह | १६,८०० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | १३,४४,२०० किमी² |
उत्तर अमेरिकेच्या नकाशावर ग्रेट लेक्स व सेंट लॉरेन्स नदी
सेंट लॉरेन्स नदी (इंग्लिश: Saint Lawrence River; फ्रेंच: fleuve Saint-Laurent) ही उत्तर अमेरिकेतील ऑन्टारियो ह्या भव्य सरोवराला अटलांटिक महासागरासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.
जलविद्युतनिर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून सुपिरियर सरोवरापर्यंत जलप्रवास शक्य आहे.
इ.स. १५३४ साली येथे पोचलेला फ्रेंच शोधक जॉक कार्तिये हा पहिला युरोपीय मानला जातो.
मोठी शहरे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |