सेंट लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट लुईस, मिसूरी या पानावरून पुनर्निर्देशित)
सेंट लुईस
Saint Louis

StLouisMontage.jpg

Flag of St. Louis, Missouri.svg
ध्वज
सेंट लुईस is located in मिसूरी
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे मिसूरीमधील स्थान
सेंट लुईस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°37′38″N 90°11′52″W / 38.62722, -90.19778गुणक: 38°37′38″N 90°11′52″W / 38.62722, -90.19778

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिसूरी
स्थापना वर्ष इ.स. १७६४
क्षेत्रफळ १७१.३ चौ. किमी (६६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६६ फूट (१४२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,१९,२९४
  - घनता १,९९१ /चौ. किमी (५,१६० /चौ. मैल)
  - महानगर २८,४५,२९८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
stlouis-mo.gov


सेंट लुईस (इंग्लिश: Saint Louis) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (कॅन्सस सिटीखालोखाल) व सर्वात मोठे महानगर आहे. हे शहर मिसूरीच्या पूर्व भागात इलिनॉय राज्याच्या सीमेवर व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. ३.१९ लाख शहरी व २८.४५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले सेंट लुईस अमेरिकेमधील ५८वे मोठे शहर व १६वे मोठे महानगर आहे.

इ.स. १७६४ साली मिसिसिपी नदीवरील एक बंदर म्हणून स्थापन केलेले सेंट लुईस १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली. इ.स. १९०४ साली सेंट लुईसमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. इ.स. १९५० नंतर येथील लोकसंख्या घसरणीला लागली.

आजच्या घडीला अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रमुख शहर असलेल्या सेंट लुईसची अर्थव्यवस्था सेवा, उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. अमेरिकेमधील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. गेटवे आर्च ही सेंट लुईसची सर्वात प्रसिद्ध खुण आहे.

इतिहास[संपादन]

सेंट लुईस शहराची स्थापना पियेर लेक्लेद व रेने ऑगस्ते चूतू ह्या फ्रेंच शोधकांनी इ.स. १७६४ साली केली. स्थापनेपासून सेंट लुईस मिसिसिपी नदीच्या काठावरील स्थानामुळे मध्य अमेरिकेमधील एक महत्वाचे वाहतूक केंद्र होते.

भूगोल[संपादन]

सेंट लुईस शहर मिसिसिपी नदीच्या पश्चिम काठावर उंचसखल भागात १७१.३ किमी क्षेत्रफळावर वसले आहे. मिसिसिपी व मिसूरी नद्यांच्या खोर्‍यातील हा भाग अत्यंत सुपीक असून येथील माल इतरत्र वाहून नेण्यासाठी सेंट लुईस बंदराचा मोठ्या प्रमाणावर होत असे.

हवामान[संपादन]

सेंट लुईसमधील हवामान तीव्र आहे. आर्क्टिक वार्‍यांमुळे येथील हिवाळे शीत व रूक्ष तर मेक्सिकोच्या आखाती वार्‍यांमुळे उन्हाळे उष्ण व दमट असतात.

हवामान तपशील: सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 77
(25)
85
(29.4)
92
(33.3)
93
(33.9)
98
(36.7)
105
(40.6)
115
(46.1)
110
(43.3)
104
(40)
94
(34.4)
86
(30)
76
(24.4)
११५
सरासरी कमाल °फॅ (°से) 37.9
(3.28)
44.3
(6.83)
55.4
(13)
66.7
(19.28)
76.5
(24.72)
85.3
(29.61)
89.8
(32.11)
87.9
(31.06)
80.1
(26.72)
68.3
(20.17)
53.8
(12.11)
42.0
(5.56)
६५.६७
(१८.७०४)
सरासरी किमान °फॅ (°से) 21.2
(−6.0)
26.5
(−3.1)
36.2
(2.33)
46.5
(8.06)
56.6
(13.67)
65.9
(18.83)
70.6
(21.44)
68.6
(20.33)
60.3
(15.72)
48.2
(9)
36.7
(2.61)
25.8
(−3.4)
४६.९३
(८.२९२)
विक्रमी किमान °फॅ (°से) −22
(−30)
−18
(−27.8)
−5
(−20.6)
20
(−6.7)
31
(−0.6)
43
(6.1)
51
(10.6)
47
(8.3)
32
(0)
21
(−6.1)
1
(−17.2)
−16
(−26.7)
-२२
वर्षाव इंच (मिमी) 2.14
(54.4)
2.28
(57.9)
3.60
(91.4)
3.69
(93.7)
4.11
(104.4)
3.76
(95.5)
3.90
(99.1)
2.98
(75.7)
2.96
(75.2)
2.76
(70.1)
3.71
(94.2)
2.86
(72.6)
३८.७५
(९८४.३)
हिमवर्षा इंच (सेमी) 7.2
(18.3)
4.7
(11.9)
3.2
(8.1)
.8
(2)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
1.5
(3.8)
4.8
(12.2)
२२.२
(५६.४)
वर्षावाचे दिवस (≥ 0.01 in) 9.4 8.2 11.1 11.4 11.3 9.6 8.3 8.1 7.5 8.5 10.1 9.4 ११२.९
हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 5.2 3.4 2.3 .4 0 0 0 0 0 0 .9 3.5 १५.७
सूर्यप्रकाश (तास) 161.2 161.0 198.4 222.0 266.6 291.0 310.0 269.7 237.0 207.7 141.0 130.2 २,५९५.८
संदर्भ: Average Temperature, Precipitation, and Snowfall [१], Sunshine Hours [२]

Extremes [३][४]

जनसांख्यिकी[संपादन]

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणार्‍या सेंट लुईसची लोकसंख्या १९५० साली सर्वाधिक होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान सेंट लुईसची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ३,१९,२९४ लोकसंख्या असलेल्या सेंट लुईसमधील ४९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८१० १,६००
इ.स. १८२०
इ.स. १८३० ४,९७७
इ.स. १८४० १६,४६९ +२३०%
इ.स. १८५० ७७,८६० +३७२%
इ.स. १८६० १,६०,७७३ +१०६%
इ.स. १८७० ३,१०,८६४ +९३%
इ.स. १८८० ३,५०,५१८ +१२%
इ.स. १८९० ४,५१,७७० +२८%
इ.स. १९०० ५,७५,२३८ +२७%
इ.स. १९१० ६,८७,०२९ +१९%
इ.स. १९२० ७,७२,८९७ +१२%
इ.स. १९३० ८,२१,९६० +६%
इ.स. १९४० ८,१६,०४८ −०%
इ.स. १९५० ८,५६,७९६ +५%
इ.स. १९६० ७,५०,०२६ −१२%
इ.स. १९७० ६,२२,२३६ −१७%
इ.स. १९८० ४,५२,८०१ −२७%
इ.स. १९९० ३,९६,६८५ −१२%
इ.स. २००० ३,४८,१८९ −१२%
इ.स. २०१० ३,१९,२९४ −८%
[५][६]

वाहतूक[संपादन]

शिक्षण[संपादन]

खेळ[संपादन]

खालील तीन व्यावसायिक संघ सेंट लुईसमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
सेंट लुईस कार्डिनल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल बुश स्टेडियम
सेंट लुईस रॅम्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एडवर्ड जोन्स डोम
सेंट लुईस ब्लूज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्कॉटट्रेड सेंटर

शहर रचना[संपादन]

सेंट लुईसचे विस्तृत चित्र
ईस्ट सेंट लुईसमधून टिपलेले चित्र.

जुळी शहरे[संपादन]

जगामधील खालील १५ शहरे सेंट लुईसची जुळी शहरे आहेत.[७]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: