सुषमा स्वराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज (हिंदी: सुष्मा स्वराज ; रोमन लिपी: Sushma Swaraj ;) (फेब्रुवारी १४, इ.स. १९५२ - हयात) या भारतातील राजकारणी असून भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. इ.स. १९९८ मध्ये अल्पकाळासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या डिसेंबर इ.स. २००९ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]