सुश्रुत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रियेमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्यक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.