सिंहस्थ कुंभमेळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेशवर येथे हा मेळा भरतो. अश्याच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.

आख्यायिका व पौराणिक संदर्भ[संपादन]

समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैनत्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

हेही पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.