साल्हेर
नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरीदुर्गच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. आजमितीला नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरीदुर्ग आहेत. या गिरीदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातच आहे.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणे या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणे तालुक्यातच आहेत.
| साल्हेर | |
साल्हेरचा किल्ला |
|
| नाव | साल्हेर |
| उंची | १५६७ मीटर |
| प्रकार | गिरीदुर्ग |
| चढाईची श्रेणी | मध्यम |
| ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
| जवळचे गाव | वाघांबे,साल्हेरवाडी |
| डोंगररांग | सेलबारी-डोलबारी(बागलाण) |
| सध्याची अवस्था | व्यवस्थित |
| स्थापना | {{{स्थापना}}} |
साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
अनुक्रमणिका |
कसे जाल ? [संपादन]
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटूनच साल्हेरचा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. १५६७ मी. समुद्रसपाटीपासून उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर, साल्हेर असे याचे नाव पडले अशा कथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.
पौराणिक संदर्भ : [संपादन]
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचीतगडा जवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा. म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.
इतिहास [संपादन]
इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव झाला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.
गडावरील पाहण्याची ठिकाणे [संपादन]
साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदीस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने आपण उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते.
साल्हेरचा माथा हा चारही बाजुने उंच कातळकडय़ांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. घरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
गडाच्या माथ्यावर मंदिर आहे. हे मंदिर रेणूका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरुनच बाण मारुण परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते.
समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत मार्कींडय़ा, खळा-जवळा, धोडप, कांचन, राजवेहेर, चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते.
पाण्याचे स्त्रोत [संपादन]
गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात.गंगासागर तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून त्याच्या आजूबाजूला जोडून असलेल्या दोन टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे.
वन्य जीवन : [संपादन]
येथे एकही वन्य प्राणी औषधालाही उपस्थित नाही. सकाळी मोरांचा आवाज कधीतरी येतो. तर उन्हाळ्यामध्ये जवळच्या धरणापाशी बिबट्या येतो असे गावकरी सांगतात.
स्थानिक भाषा : [संपादन]
स्थानिक भाषा हि "अहिराणी" / "ऐरणी" आहे. ती मराठी मिश्रित भाषा आहे.
दळणवळण : [संपादन]
संध्याकाळी ७ ते ७:३० पर्यंत ST वाघाम्बे गावात येते. तेथून पुढे ती साल्हेर गावात जाते आणि रात्री तिथेच मुक्काम करते. तीच बस परत सकाळी निघून वाघाम्बे गावात ८:३० ला येते. चिंचोली गावावरून साल्हेर ला येणारी बस सकाळी ११ वाजता आणि ५:३० ला साल्हेर गावातून निघते. पूर्ण दिवसात येथे २ वेळाच बस येते. बाकी खाजगी जीप गाड्या चालू असतात.
हेसुद्धा पाहा [संपादन]
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||