सामुद्रधुनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सामुद्रधुनी हा एक पाण्याचा असा नैसर्गिक कालवा आहे जो दोन मोठ्या जलाशयांना जोडतो. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुनी दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या मधे. बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखातासोबत जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या मधे. उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीसोबत जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या मधे. भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते.
