साबूदाणा
साबूदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम (Sago) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, खीर तसेच खिचडी अथवा उसळ बनवण्यासाठी करतात.
भारतात साबूदाण्याचे उत्पादन प्रथम तमिळनाडू मधील सेलम येथे झाले आणि इ.स. १९४३-४४ च्या आसपास भारतात याचे उत्पादन कुटीर उद्योगाच्या स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम टॅपिओका (Tapioca) या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात आणि ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात.
सांस्कृतिक महत्त्व [संपादन]
महाराष्ट्रातील बहुसंख्य भागात साबुदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ उपवासासाठी मान्य आहेत.
लागवडीची पद्धत [संपादन]
टॅपिओका हा एक प्रकारचा कंद असतो.तो साबुदाण्याचे झाडास खाली जमीनीत लागतो.साबुदाण्याचे झाडाचे लागवडीस जास्त भारी नसलेली पण नरम व भुसभुशीत,हलकी मुरमाड पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हवी. साबुदाण्याच्या झाडाच्या दांडीचे सुमारे ६-६ इंच लांबीचे तुकडे करून व ते ३-३ इंच जमीनीत व तेवढेच वर ठेउन याची लागवड केली जाते. या झाडास मग कंद धरतात. याची लागवड साधारणतः जुन-जुलै महिन्यात करतात. दोन झाडांमधेएल अंतर ९०x९० सें.मीटर ठेवतात.
याचे वेगवेगळे वाण आहेत.