साबू दस्तगीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साबु दस्तगीर या पानावरून पुनर्निर्देशित)
साबु दस्तगीर १९४२ च्या जंगलबुक चित्रपटात

साबू दस्तगीर (जानेवारी २७, इ.स. १९२४:म्हैसूर जवळ कारापूर - डिसेंबर २, इ.स. १९६३:चॅट्सवर्थ, कॅलिफोर्निया) हा हॉलिवूडमध्ये सफल झालेला पहिला भारतीय अभिनेता होता.

चित्रपट[संपादन]

साबूने वयाच्या १३व्या वर्षी प्रथम सिनेमात काम केले. यानंतर अंदाजे २०-२५ चित्रपटांत विविध भूमिका केल्या. द थीफ ऑफ बगदाद या चित्रपटातील अबुची भूमिका सगळ्यात स्मरणीय ठरली. याशिवाय जंगलबुक, मॅन ईटर्स ऑफ कुमाउं वगैरे अनेक चित्रपटांतील भूमिका समीक्षकांची दाद घेउन गेल्या.

हवाई दल[संपादन]

इ.स. १९४४मध्ये साबू अमेरिकेचा नागरिक झाला व अमेरिकेच्या हवाई दलात टेल गनर (विमानाच्या शेपटात बसून मोठी बंदूक चालवणारा) म्हणून रुजू झाला. अनेक वेळा लढाईत भाग घेउन त्याने डिस्टींग्विश्ड फ्लाईंग क्रॉस हे पदक मिळवले.

खाजगी जीवन[संपादन]

साबू मैसूरच्या महाराजाच्या महावताचा मुलगा होता. हत्तीशाळा स्वच्छ करीत असताना पाश्चिमात्य चित्रपट निर्देशक रॉबर्ट जे. फ्लॅहर्टीच्या नजरेस पडला व त्याने साबूला आपल्या एलिफंट बॉय या चित्रपटात भूमिका दिली. साबूच्या नावाबद्दल मतभेद आहेत. पत्रकार फिलिप लीबफ्रीडच्या मते याचे खरे नाव सेलार शेख साबू असे होते. साबूने इ.स. १९४८मध्ये मेरिलिन कूपर नावाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये झाली. साबूच्या मित्रमंडळीत जेम्स स्टुअर्ट, रोनाल्ड रेगन वगैरे हॉलिवुडातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे होती.

बाह्य दुवे[संपादन]