सह्याद्री (वाहिनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनसह्याद्री (नि:संदिग्धीकरण)

सह्याद्री वाहिनी
सह्याद्री (वाहिनी) दूरदर्शन
सुरुवात इ.स. १९९४
मालक प्रसार भारती
ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम्
देश भारत
प्रसारण क्षेत्र भारत, चीन, आखाती देश, इतर जगातील बहुसंख्य देश
मुख्यालय मुंबई
जुने नाव दुरदर्शन केंद्र मुंबई
भगिनी वाहिनी दूरदर्शन च्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि दिल्ली दूरदर्शन केंद्र
प्रसारण वेळ २४ तास प्रक्षेपण
संकेतस्थळ www.ddkSahyadri.tv

सह्याद्री ही दुरदर्शन ची मुख्यत्वेकरुन महाराष्ट्रात काम करणारी उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी दुरदर्शनची वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरु असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दुरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण बनविल्या जातात.

त्याचे मुख्यालय हे वरळी, मुंबई येथे आहे. सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने(Outdoor Broadcasting vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परीपुर्ण आहे. या वाहिनीच्या इतर मराठी स्पर्धकांपेक्षाही (TRP rating )(जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या असण्याचा दर?)[मराठी शब्द सुचवा]मध्ये पुष्कळच पुढे आहे.