सवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सवाई (अनेकवचन सवाया) हा एक काव्य प्रकार (छंद) समर्थ रामदास यांनी नव्याने आणला. त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत करत आपल्या धर्माची ओळख करून देत. सवाया खूप आवेशाने म्हटल्या जात, त्यामुळे लोकांमध्ये धर्मप्रेम, देशप्रेम निर्माण होत असावे. सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते. ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते. समर्थ म्हणतात :

तुझा भाट मी वर्णितो रामराया
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
महाराज दे अंगीचे वस्त्र आता
बहुजीर्ण झाली देहे बुद्धि कंथा !

यांतील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर ‘या’ दीर्घ म्हणायचे. तुझा, सदा, ‘महाराज’मधील महा ही अक्षरे ठासून म्हणायची. गुढी पाड्व्यापासून दशमीपर्यंत वरील श्लोकाचे सूर शे-दीडशे वर्षे गांवांगांवांतून याच पद्धतीने म्हटले जातात.

समर्थ म्हणतात, की रामराया मी तुझा भाट आहे. मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे. नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे. लोकांना धर्माची, देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.

आणखी काही सवाया[संपादन]

वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा ।। १

राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा ।। २

अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा ।। ३

धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा ।। ४

म्हणावा जयजय राम !


धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला ।। १

वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली ।। २

कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या ।। ३

भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या ।। ४

म्हणावा जयजय राम !


मूळ स्रोत मजकूर विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरित[संपादन]

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: सवाई हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:सवाई येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.

* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:

सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः सवाई आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा सवाई नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:सवाई लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.

* असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित सवाई ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित सवाई ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.