सप्तमातृका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सप्तमातृका | |
| अन्य नावे/ नामांतरे | अष्टमातृका |
| नामोल्लेख | देवीमाहात्म्य, देवी भागवत पुराण, देवी पुराण, महाभारत, मत्स्य पुराण, वराह पुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण |
सप्तमातृका ह्या सात हिंदू देवी सदा एकत्र पूजल्या जातात. ब्राह्मी (ब्रह्मिणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. काही वेळा यांमध्ये नारसिंही देवीचाही समावेश केला जातो; तेव्हा या विस्तृत समूहाला अष्टमातृका असे म्हणतात. शाक्त व तांत्रिक संघांमध्ये सप्तमातृका वंदिल्या जातात.