सदाशिव कानोजी पाटील
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सदाशिव कानोजी पाटील, तथा स.का. पाटील, (१४ ऑगस्ट, इ.स. १९०१ - मृत्युदिनांक अज्ञात १९८३ ? ) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. इ.स. १९५७ ते इ.स. १९६७ या कालखंडात ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते.
| सदाशिव कानोजी पाटील | |
|---|---|
| जन्म | १४ ऑगस्ट, इ.स. १९०१ |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| टोपणनावे | स.का. पाटील |
| राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
अनुक्रमणिका |
जीवन [संपादन]
सदाशिव पाटील मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले. [२]बॉम्बे मिल मजदूर युनियन ची स्थापना केली पण नंतर हि युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मध्ये विलीन केली.[३]
मुंबईत रात्रशाळेत शिकवण्यासाठी वेळ दिला [४]
मुंबईचे माजी महापौर, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.
राजकीय कारकिर्द [संपादन]
खासदारकी आणि मंत्रिपद स.का. पाटीलांनी कामगार संघटनेचे नेतृत्वही केले होते परंतु ते अर्थशास्त्रातील उजव्या विचारसरणीचे समजले जात.कॉंग्रेसच्या वतीने कम्युनीस्ट आणि डाव्या विचारधारांना राजकारणात मात देण्याचा प्रयत्न स.का. पाटलांनी केला असे समजले जाते , आंध्र आणि महाराष्ट्रातील राजकारणातच नव्हे तर सिंडिकेटच्या माध्यमातून इंदीरा गांधींच्या डाव्या भूमीकांनाही त्यांनी अडथळे उभे केले. [५] [६] [७][८][९]
तत्कालीन नेहरू मंत्रीमंडळातील डाव्या आर्थीक नितींचे प्रतिनिधीत्व करणारे व्हि.के कृष्णमेनन हे केंद्रीय मंत्री मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत,ते दाक्षीणात्य होते, त्यांना राजकारणात परास्त करण्याकरिता,मुक्त अर्थशास्त्राचे समर्थक स का पाटीलांनी दाक्षीणात्यांना विरोधाची भूमीका लावून धरणाऱ्या शिवसेनेस पुढे आणले असे काही राजकीय निरीक्षकांचे मत होते. कृष्णमेनन यांना दूर करण्याकरिता तत्कालीन औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या 'जूट प्रेस' वृत्तपत्रातूनही कृष्ण मेनन विरोधाचे वातावरण जाणीवपुर्वक तापवले जात असल्याचा डाव्या विचारसरणीच्या निरिक्षकांचे मत होते.[१०]
मुंबईचे महापौर,मुंबई कॉंग्रसचे आणि नंतर महाराष्ट्र कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी पदे भुषविली. एकूण तीन वेळा लोकसभेत मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, इ.स. १९६७च्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी पाटलांचा पराभव केला.[११]
अमेरिकेकडून अन्न आयात [संपादन]
केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का. पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि १,०००,००० टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेववून तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष आयझेनहॉवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लाननंतर ही अमेरिकेने दुसर्या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.[१२]. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहोवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. [ संदर्भ हवा ]
ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या कॉंग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. [ संदर्भ हवा ]
आमेरीका-सोव्हीएत शीतयुद्धाच्या काळात, स.का.पाटीलांवर अमेरिकेशी विशेष हितसंबध असल्याचे दर्शवणारी हेतुपुरस्सर खोटी कागदपत्रे,सोव्हीएत गुप्तचरांनी बनवून वितरीत केल्याचा दावा नंतरच्या काळात रशीयन गुप्तचराने स्वत: केला.[१३]
मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध [संपादन]
स.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली. [१४]या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशा स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली. [१५][१६] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच हार पत्करावी लागली.
ग्रंथ लेखन [संपादन]
The Indian National Congress a case for its reorganisation. (भाषा इंग्रजी)[१७] प्रकाशन वर्ष इस १९४५ औंध प्रकाशन ट्रस्ट औंध
बाह्य दुवे [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ http://blog.offstumped.in/2007/06/19/the-patil-who-gave-communists-sleepless-nights/
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=250639
- ↑ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205977:2012-01-18-18-23-20&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-8727248,prtpage-1.cms
- ↑ http://blog.offstumped.in/2007/06/19/the-patil-who-gave-communists-sleepless-nights/
- ↑ http://www.indianexpress.com/news/the-future-is-federal/936814
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2273240
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=38294899
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/7272724.cms
- ↑ http://www.mainstreamweekly.net/article3178.html
- ↑ http://www.indiankanoon.org/doc/157442/
- ↑ /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली
- ↑ The KGB papers - ‘It seemed like the entire country was for sale’ दि टेलीग्राफ,कलकत्ता मधील Sunday, September 25, 2005 ला प्रकाशित लेख दिनांक २२/०४/२०१२ला भाप्रवे सायं १८.३० वाजता जसा दिसला
- ↑ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1257648
- ↑ १५ नोव्हेंबर, इ.स. १९५५ लोकसभा चर्चेतील सहभाग
- ↑ Guha, Ramachandra (2003-04-13). The battle for Bombay. The Hindu. 2008-11-12 रोजी पाहिले.
- ↑ http://openlibrary.org/works/OL12895952W/The_Indian_National_Congress