सतीश वसंत आळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सतीश वसंत आळेकर
[[File:
Satish Alekar 01.jpg
|225px|alt=सतीश आळेकर]]
सतीश वसंत आळेकर
जन्म जानेवारी ३०, इ.स. १९४९
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा नाट्यलेखन , नाट्यसंस्था उभारणी आणि नाट्यप्रशिक्षण
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार


सतीश वसंत आळेकर (जानेवारी ३०, इ.स. १९४९ - हयात) हे मराठी नाटककार आहेत.

जीवन[संपादन]

आळेकरांचा जन्म जानेवारी ३०, इ.स. १९४९ रोजी दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.एस्सी.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.

'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या ' मिकीमाऊस आणि मेमसाब ' , ' महापूर ' , ' महानिर्वाण ' , ' बेगम बर्वे ' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ' महापूर ' , ' महानिर्वाण ' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले. कै. पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.

कारकीर्द[संपादन]

नाटक सहभाग प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती प्रकाशक
अतिरेकी लेखन इ.स. १९९०
दुसरा सामना लेखन इ.स. १९८९ नीलकंठ प्रकाशन
बेगम बर्वे लेखन इ.स. १९७९ नीलकंठ प्रकाशन
महानिर्वाण लेखन इ.स. १९७४ १९७९, १९८७, १९.., २०११ नीलकंठ प्रकाशन
महापूर लेखन इ.स. १९७६ नीलकंठ प्रकाशन
मिकी आणि मेमसाहेब लेखन इ.स. १९७४ नीलकंठ प्रकाशन
शनिवार- रविवार लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
एकांकिका सहभाग प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती -
आधारित लेखन इ.स. २०११
झुलता पूल लेखन इ.स. १९७२ नीलकंठ प्रकाशन
दार कोणी उघडत नाही लेखन इ.स. १९९६ नीलकंठ प्रकाशन
बसस्टोप लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
भिंत लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
भजन लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
मेमरी लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
वळण लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन
सामना लेखन इ.स. नीलकंठ प्रकाशन

पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री पुरस्कार : इ.स. २०१२ [१]
  • बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार
  • द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार
  • सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

(http://www.cultureunplugged.com/play/2003/Satish-Alekar--The-Playwright)