संगमेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?संगमेश्वर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील संगमेश्वर
पंचायत समिती संगमेश्वर


संगमेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे.

संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव व तालुका आहे.

संगमेश्वर
जिल्हा रत्‍नागिरी जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या N/A
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२३५४
टपाल संकेतांक ४१५६११
वाहन संकेतांक MH-०८
निर्वाचित प्रमुख N/A
(सरपंच)


इतिहास[संपादन]

संगमेश्वर हे देवालयांचे गाव आहे. हया परिसरात सुमारे ७० पांडवकालिन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. अख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालिन लिपीत कोरलेले लेख आहेत. अख्यायिकेनुसार, जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपवलेले द्रव्य मिळेल. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ दुर्मिळ सूर्यमंदिर आढळते.

मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी ह्यांना संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या सरदाराने कैद केले.

भूगोल[संपादन]

संगमेश्वर हे शास्त्री आणि सोनवी ह्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. ते परीसरातील एक मह्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथुन रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर मुंबई - गोवा महामार्गावर ( राष्ट्रीय महामार्ग १७) वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. संभाजीराजांचे मुख्य ठाणे श्रृंगारपूर हे देखील संगमेश्वरच्या जवळ आहे.

प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर आहे. मार्लेश्वर हे देवालयातील साप आणि देवालयापाठच्या नयनरम्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.

कर्णेश्वर मंदिरातील कोरीव नक्षी
संगमेश्वर स्टेशनवरील पर्णकुटी
रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड | दापोली | खेड | चिपळूण | गुहागर | संगमेश्वर | रत्‍नागिरी | लांजा | राजापूर