षा'न्शी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षा'न्शी
陕西省
चीनचा प्रांत

षा'न्शीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
षा'न्शीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी शीआन
क्षेत्रफळ २,०५,८०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३,७७,२०,०००
घनता १८० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.shaanxi.gov.cn/

षा'न्शी (नवी चिनी चित्रलिपी: 陕西; जुनी चिनी चित्रलिपी: 陕西; फीनयीन: Shǎnxī; उच्चार: षान्-शीऽऽऽ; अर्थ: पश्चिम षानचौ) हा उत्तर-मध्य चीनमधील प्रांत आहे. याच्याजवळच याच नावाशी साधर्म्य असलेला, मात्र नावाचा निराळा स्वरोक्त उच्चार असलेला षान्शी नावाचा वेगळा प्रांत आहे. षा'न्शीच्या ईशान्येस षान्शी, पूर्वेस हनान, आग्नेयेस हूपै, दक्षिणेस चोंगछिंग नगरपालिका, नैऋत्येस सच्वान, पश्चिमेस कान्सू, वायव्येस निंग्श्या व उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत वसले आहेत. शीआन येथे षा'न्शीची राजधानी आहे.

जानेवारी २०, इ.स. १५५६ला येथे झालेल्या भूंकपात अंदाजे ८,३०,००० व्यक्ती मरण पावल्या होत्या.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: