श्री.पु. भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री.पु.भागवत या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री.पु.भागवत ( २७ डिसेंबर १९२३ - मृत्यू: २१ ऑगष्ट २००७)
महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष

शिक्षण- एम.ए. मुंबई विद्यापीठ
संपादक आणि प्रकाशक - मौज प्रकाशन गृह 1950-2007.
मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन.
लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्यःअध्यापन आणि प्रकार.

पुरस्कार[संपादन]

श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री. पु. भागवत स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रु. असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या प्रकाशनसंस्था---

इ.स. २००९ -
इ.स. २०१०- औरंगाबाद येथील 'साकेत' प्रकाशन
इ.स. २०११ - संजय भागवत (मौज प्रकाशन)
इ.स. २०१२ - मॅजेस्टिक प्रकाशन
इ.स. २०१६ - भारतीय विचार साधना प्रकाशन
इ.स. २०१८ - ४८ वर्षे मराठी प्रकाशन क्षेत्रात निरंतरपणे कार्यरत असलेलेल्या आणि सुमारे ३००हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केलेले 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशन इ..स. २०२१ - श्रीरामपुरातील शब्दालय प्रकाशन