शिसवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिसव या पानावरून पुनर्निर्देशित)

शिसव किंवा शिसवी (Fabaceae -pea, or legume- कुळातले आहे. भारतात शिसवीचे दोन प्रकार आढळतात. (१) Dalbergia sissoo (North Indian Rosewood) (२) Dalbergia Latifolia (काळी शिसव) ( South Indian Rosewood) ( East Indian rosewood) (Bombey Blackwood) (Origional Rosewood)

हा २५ ते ३० मीटर उंच वाढणारा वृक्ष आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिसवीचे लाकूड असे म्हणतात. सागापेक्षा टिकाऊ, दणकट, नक्षीकाम करण्यासाठी उत्तम. काळ्या शिसवीच्या लाकडाने एकेकाळी महाल आणि वाडे बांधत असत. असल्या घरातील वातावरण उबदार असते. हे झाड लॅटिन नावातला sissoo हा शब्द शिसवी शब्दापासून निघाला आहे. Dalbergia हा शब्द स्वीडिश शास्त्रज्ञ निल्स व कार्ल डलबर्ग यांच्या नावांवरून घेतला आहे. Dalbegia Sissoo हे झाड उत्तर भारतात सर्वसाधारणपणे आढळते तर Dalburgia Latifolia हे जास्तीत जास्त दक्षिण भारतातच (केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या काही पर्वतीय भागात) आढळते. महाराष्ट्रात पानझडी जंगलात Latifolia प्रजातीची झाडे आढळुन येतात तर उर्वरित क्षेत्रात sissoo प्रजातीची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत.

भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे देश या शिसवीच्या झाडाचे मूळ स्थान आहेत. सदर व्रुक्षाचे लाकूड खैराइतकेच वजनदार असते. प्राचीन भारतीय ग्रंथामध्येही बृहत्सहिता इ. मध्ये शिसवीच्या लाकडाचे खुप महत्व सांगितले आहे, प्राचीन काळात काळ्या शिसवीच्या लाकडापासुन देव्हारे बनविले जात.

शिसवी वृक्षाची अन्यभाषिक नावे[संपादन]

  • इंग्रजी : Blackwood-tree, Indian dalbergia, Indian rosewood, east Indian Rosewood, shisham
  • कानडी : अगर
  • गुजराथी : સીસમ -सीसम
  • तमिळ : சிசே सिसे, ஈட்டிமரவகை इत्तिमरावकई, மரவகை मरवकई, நூக்கம் नुक्कम
  • तेलुगू :: ఇరుగుడుచెట్టు इरुगुडुसॆत्तू, శికుప सिकुपा, శింకవ सिंकवा, శింకువ सिंकुवा
  • पंजाबी : अगुरू, शिशपा
  • बंगाली : শিশ सिसू
  • मणिपुरी : सिस्सू
  • मराठी : शिसव, शीशम,शिसवी किंवा शिंसवी
  • शास्त्रीय लॅटिन नाव : Dalbergia sissoo आणि Dabergia Latifolia
  • हिंदी : शीशम