शिर्डी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिर्डी विधानसभा मतदारसंघ - २१८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शिर्डी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळ आणि २. राहाता तालुक्यातील राहाता, राजुरी, लोणी ही महसूल मंडळे आणि शिर्डी व राहाता पिंपळास नगरपालिकेचा समावेश होतो. शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील भारतीय जनता पक्ष
२०१४ राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]