शरदचंद्र टोंगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरदचंद्र गोपाळराव टोंगो ( १० मार्च, इ.स. १९१६ - मृत्यू: ५ नोव्हेंबर, इ.स. २००९ ) हे विदर्भातील लेखक तसेच पत्रकार होते.

कारकीर्द[संपादन]

शरदचंद्रांचा जन्म १० मार्च, इ.स. १९१६ यादिवशी यवतमाळ येथे झाला. त्यांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील असून त्यांचे वडील क्रांतिकारक होते. शरदचंद्रांनी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात केली. नंतर ते माध्यमिक शिक्षकही झाले. त्यानंतर यवतमाळ येथील एका महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करून तिथेच सेवानिवृत्त झाले.

लोकमत या दैनिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी १५ वर्षे सांभाळली होती.

लेखन[संपादन]

शरदचंद्र यांनी कथा, कादंबऱ्या, कविता आणि नाटक या साहित्यक्षेत्रात विपुल लेखन केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या कविता 'कु. शोभना देशपांडे' या नावाने प्रसिद्ध केल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अशी -

  • पेशावरचा चाकू (कथासंग्रह)
  • नव्या डहाळ्या (नाटक)
  • नवे खोपे (नाटक)
  • समशेरचे पाणी (कादंबरी)
  • गारव्यातील मुलाखती (कादंबरी)

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • उमरखेड येथे इ.स. १९७५ साली भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाचे अध्यक्षपद शरदचंद्र टोंगो यंनी भूषविले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]