व्हिक्टोरिया राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिक्टोरिया, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिक्टोरिया
Victoria

कार्यकाळ
२० जून १८३७ – २२ जानेवारी १९०१
पंतप्रधान
मागील विल्यम चौथा
पुढील एडवर्ड सातवा

भारताची सम्राज्ञी
कार्यकाळ
१ मे १८७६ – २२ जानेवारी १९०१
पुढील एडवर्ड सातवा

जन्म २४ मे १८१९
लंडन
मृत्यू २२ जानेवारी १९०१ (वयः ८१)
आईल ऑफ वाइट
पती साक्से-कोबर्ग व गोथाचा राजपुत्र आल्बर्ट
अपत्ये
सही व्हिक्टोरिया राणीयांची सही

व्हिक्टोरिया (अलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया; २४ मे १८१९ - २२ जानेवारी १९०१) ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती व ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती. ती इ.स. १८३७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली.[१]. ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो. इ.स. १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला. त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा राणीचा जाहिरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानची सम्राज्ञी असा पुढे तिने किताब ही धारण केला.


व्हिक्टोरिया राजा तिसरा जॉर्ज ह्याची नात होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ म.फुले समग्र वाङमय पृ.७३५ आवृत्ती पाचवी<