वॉरन बफे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वॉरन बफे Warren Buffett |
|
|---|---|
| जन्म | वॉरन एडवर्ड बफे ३० ऑगस्ट, इ.स. १९३० ओमाहा, नेब्रास्का, |
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| पेशा | बर्कशायर हॅथवेचे प्रमुख अधिकारी |
| निव्वळ मालमत्ता | ६२ अब्ज अमेरिकन डॉलर्स |
| स्वाक्षरी | |
वॉरन बफे (इंग्लिश: Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ साली ते तिसर्या क्रमांकावर आहेत.
ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणार्या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी (चॅरिटी) दान केला आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत