वैजनाथ
| वैजनाथ | |
| नाव: | वैजनाथ मंदिर |
|---|---|
| निर्माता: | स्वयंभू |
| जीर्णोद्धारक: | अहिल्याबाई होळकर |
| निर्माण काल : | अति प्राचीन |
| देवता: | ॐ |
| वास्तुकला: | हिन्दू |
| स्थान: | महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.
परळी येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ 2५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे. [१]
दुसरी बाब अशी की या ठिकाणी ९२० मेगावॅट उत्पादन क्षमतेचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे.[२]
संदर्भ [संपादन]
- ↑ तीर्थक्षेत्रे. (१७ ऑगस्ट, इ.स. २०१२). १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
- ↑ http://www.mahagenco.in/INSTALLED-CAPACITY-01.shtm
|
||||||||||||||