विनायक महादेव दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. वि.म. दांडेकर, पूर्ण नाव : विनायक महादेव दांडेकर (जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - - इ.स. ३१ ऑगस्ट, १९९५) हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्‍ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.

वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही.

कार्य[संपादन]

दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्‍ज्ञ सल्लागार म्हणून काम केले. भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक समस्यांविषयीही त्यांनी सखोल संशोधन केले.[१]

लेखन[संपादन]

शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.[२]

अन्य पुस्तके[संपादन]

  • Artha vijnana
  • The Indian Economy, 1947-92 (दोन खंडांत. १ला खंड शेती. २रा खंड रोजगार, दारिद्‌ऱ्य आणि लोकसंख्या)
  • The cattle economy of India
  • Crop insurance for developing countries (A/D/C teaching and research forum)
  • गाईचे अर्थशास्त्र
  • गांधीवादाची शोकांतिका (लेख)
  • गावरहाटी (सहलेखक म.भा. जगताप)
  • The Demand for Food, and Conditions Governing Food Aid During Development
  • Democratic decentralization (Harold Laski Institute of Political Science. Publication no. 80)
  • Peasant-Worker Alliance: Its Basis in the Indian Economy
  • Population front of Indias economic development (Hukerikar memorial lecture)
  • भारतातील दारिद्‌ऱ्य
  • भारतीय अर्थव्यवस्थेतील बेकारी आणि असमतोल
  • महाराष्ट्राची ग्रामीण समाजरचना (सहलेखक म.भा. जगताप)
  • मी बाई आहे म्हणून (संपादित ग्रंथ)
  • Measurement of poverty (R.R. Kale memorial lecture)
  • Report of the Expert Committee on Tax Measures to Promote Employment
  • Report on the Poona Schedules of the National Sample Survey (1950-51). Gokhale Institute of Politics and Economics, Publication No. 26
  • Use of food surpluses for economic development (Gokhale Institute of Politics and Economics Publication)
  • A survey of famine conditions in the affected regions of Maharashtra and Mysore (Gokhale Institute mimeograph series, No. 13)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारताच्या आर्थिक समस्यांविषयी संशोधन करणारे अर्थतज्ञ – वि. म. दांडेकर (1920-1995)". ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Poverty in India" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2014-04-03. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादित title= ignored (सहाय्य)