विठ्ठल
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा प्रामुख्याने विष्णु किंवा कृष्णस्वरूप समजला जातो. परंतु तो काही परंपरांमध्ये तो शिव किंवा व बुद्धही मानला जातो. विठोबाच्या प्रतिमा ह्या एका कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळां पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत ४ लाख भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]
विठोबाशी निगडित कथा [संपादन]
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. संत नामदेव,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. हरिनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्त्रोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
संदर्भ [संपादन]
- ↑ सोलापूर ज़िल्ह्याच्या संकेतस्थळावरील पंढरपूर वरील पान. एन. आई. सी.. २००७-०९-३० रोजी पाहिले.
हेही पहा [संपादन]
- आदिशंकराचार्यरचित पांडुरंगाष्टकम्
- पंढरपूर
- रखुमाई