विक्रमशिला विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विक्रमशिला विद्यापीठाचे भग्नावशेष
विक्रमशिला विद्यापीठ is located in बिहार
विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठाचे बिहारच्या नकाशावरील स्थान

विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील पाल साम्राज्यात असलेले एक बौद्ध शिक्षणकेंद्र होते. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत.

अनुक्रमणिका

पार्श्वभूमी [संपादन]

विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या बिहार राज्याच्या भागलपूर जिल्ह्यात भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. याची स्थापना पाल राजा धर्मपाल याने नवव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती.

अस्त [संपादन]

इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने विक्रमशिला विद्यापीठ पूर्णपणे उध्वस्त केले.[१].

उत्खनन [संपादन]

विक्रमशिला विद्यापीठ ज्या ठिकाणी होते तिथे सर्वप्रथम पाटणा विद्यापीठातर्फे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत आणि त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने इ.स. १९७२ ते इ.स. १९८२पर्यंत उत्खनन केले गेल्यामुळे विक्रमशिला विद्यापीठाबाबतच्या अनेक गोष्टी उजेडात आल्या.

चित्रदालन [संपादन]

संदर्भ व नोंदी [संपादन]

  1. स्कॉट, डेव्हिड (मे, इ.स. १९९५). बुद्धिझम अ‍ॅन्ड इस्लाम:पास्ट टु प्रेझेंट एनकाउंटर्स अ‍ॅन्ड इंटरफेथ लेसन्स. न्यूमन. १७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.