सहाय्य:नेहमीचे प्रश्न
[संपादन] देवनागरी लिपी संगणकावर प्रतिस्थापित कशी करावी?
The Frequently Asked Questions about Devanagari setup are located here...
देवनागरी लिपी संगणकावर प्रतिस्थापित करण्याविषयीचे नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न येथे उपलब्ध आहेत आणि ती सध्या केवळ इंग्रजी आवृत्ति आहे.
[संपादन] विकिपीडियावर मराठीत डायरेक्ट टाईप का करता येत नाही(मराठी कळपट का नाही)?
- ऊ.पहा आणि चर्चा करा चावडी/विकिपीडियात कळपट हवा
[संपादन] विकिपीडियावर लेखन कसे करावे?
[संपादन] मराठी लेखन नीट दिसत नाही.
[संपादन] मराठी अक्षरे फायरफॉक्स् मधे नीट दिसत नाहीत.
[संपादन] मराठी शुद्धलेखन विषयक प्रश्न.
[संपादन] How to Fix Inaccurate Wikipedia Articles
[संपादन] लेखाचे नाव देणे, बदलणे, इंग्रजी नावांचे/शब्दांचे मराठी लेखन कसे करावे?, साररख्या नावांचे नि:संदग्धीकरण इत्यादी संबधीत प्रश्न
[संपादन] मला इंग्लिश चित्रपट नामसूची या वर्गात एक नवीन लेख द्यायचा आहे. नवीन लेख तयार केल्यानंतर त्याचा दुवा या वर्गात कसा देता येईल?
- लेखाच्या शेवटी [[वर्ग:इंग्लिश चित्रपट नामसूची]] असे लिहिले असता लेख आपोआप त्या वर्गात समाविष्ट होइल.
[संपादन] कुसुमाग्रज या पानावर त्यांच्या माहितीऐवजी त्यांच्या केवळ कविता देण्यात आल्या आहेत.याबाबत कॉपीराईटचा भंग झाला आहे काय? मी माहिती जमवत असलेल्या इंदिरा संत यांच्या लेखातही काही कवितांची उद्धरणे देता येतील काय?
- लेखक किंवा कवीचा लेखन प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास समीक्षण तुलनात्मक समीक्षण करण्याच्या दृष्टीने उद्धरणे देणे योग्य आहे । सद्यस्थितितील कुसुमाग्रज लेख खरेच प्रताधिकार कायद्यातील नियमास धरून नाही ; दुसरे तर तशी प्रताधिकार मुक्ततेची परवानगी मिळवली तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात संपूर्ण लेखन जसेच्या तसे देता येते;विकिबूक्स या सहप्रकल्पात कौसुमाग्रजांच्या कविता शिकवता येतील तर विकिविद्यापीठ सहप्रकल्पात त्यांच्या कवितांबद्दलची प्रश्नोत्तरे अंतर्भूत करता येतील. सुयोग्य लेखात गोविंद विनायक करंदीकर हा लेख उदाहरणा करिता पहावा ।
[संपादन] शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का?
- शंका येथे मदतकेंद्रात ,चावडीवर आणि संबधीत लेखाविषयीच्या शंका लेखाच्या चर्चा पानावर तातडीच्या प्रबंधकीय मदती करिता प्रबंधकांच्या चर्चापानावर शंका विचारू शकता।
[संपादन] सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
- संबधीत सदस्यांच्या चर्चापानावर संपर्क करून
[संपादन] सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
- सही बद्दल अधिक माहिती Wikipedia:Signaturesयेथे वाचा .
[संपादन] I would like to write in Marathi विकिपीडिया. I am interested in writing for Marathi Wikipedia. How should I go about it? I have become a member of this just now. Kindly help me.
विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार ~~~~; वापरुन आपली सही नोंदवावी.
[संपादन] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
[ चित्र हवे] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
- लेखामध्ये [[चित्र:<imagename>.<extension>]] असे लिहावे. उदा. [[चित्र:Yes.png]] लिहिल्यास असे दिसेल:
To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs. Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.
[संपादन] How can I add images on Marathi wikipedia which are already available on English version? How can I use that link? I tried few things but those didnt work.
- केवळ commons मधील उपलब्ध छायाचित्रे इतर विकि प्रकल्पात वापरता येतात.प्ररंतु एका भाषेतील विकिप्रकल्पातील संचिका दुसर्या प्रकल्पात सरळ आयात करता येत नाहीत त्या करिता अशी संचिका आपल्या संगणकावर उतरवून पुन्हा चढवावी लागते.
[संपादन] माझा प्रवेश होत नाही, काय कारण असावे?
- शक्यता एक : काही वेळा प्रवेश झाला असतो पण कुकीज क्लिअर न केल्या मुळे दिसत नाही एखाद्या नवीन् पानावर संपादन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रवेश झाला आहे किंवा नाही हे लक्षात येईल.
- शक्यता दोन : अर्थात तुमचा प्रवेश् तुम्ही सदस्य नावाने करावयास हवा सदस्य क्रमांकाने नाही
- शक्यता तीन :पासवर्ड विसरला आहात?
- या शिवाय इतर काही प्रॉब्लेम असेल तर एरर मेसेज् यायला हवा तसा येत असेल् तर ती माहिती मदत केंद्रावर देणे
- तसेच नवे खाते बनवून किंवा खात्यात प्रवेश न करताही बहूतेक लेखांचे संपादन करता येते.
[संपादन] संदर्भ कसे द्यावेत
- लेखाच्या तळाशी == संदर्भ व नोंदी == <references/> हि नोंद आहे याची खात्री करून घ्यावी
- संपादन खिडकी सुरू झाल्या नंतर देवनागरीत लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा.(परीक्षणकाल) लिपी बदलण्यासाठी Esc दाबा, या ऑळी च्या वरच्या ओळीत डावी कडून डावी कडे तीसरी <ref></ref> अशी खूण दिसेल. जीथे तुम्हाला संदर्भ द्यावयाचा आहे तीथे कर्सर ठेऊन <ref></ref>वर टिचकी मारा. <ref>Insert reference material</ref>असे दिसेल <ref> आणि </ref> च्या मध्ये संदर्भ लिहावेत. लेखाच्या तळाशी संदर्भ आपोआप तयार होणार्या क्रमांका सहीत सहज दिसतो.उदाहरणार्थ <ref>(उदाहरणार्थ )G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff</ref>[१]
कृपया महात्मा गांधी या लेखाचा स्रोत पाहा. त्यात अनेक संदर्भ दिले आहेत.
[संपादन] विकिपिडियावर छायाचित्रे/चित्रे ? संचिका कशी चढवावी? नव्या इमेज कशा उपलोड कराव्यात? मला काही पानांमध्ये चित्रे वापरायची आहेत. इंग्रजी विकिपीडियातील चित्रे मराठी विकिपीडियात का वापरता येत नाहीत ?
- मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता परंतू प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे अधिक श्रेयस्कर असते कारण विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका विकिमीडिया/विकिपीडियाच्या सर्व सहप्रकल्पात सर्व भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबूक्स इत्यादीत वापरणए सोपे जाते.अर्थातच विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका मराठी विकिपीडियावरसुद्धा वापरता येतात.
प्रताधिकारीत संचिकांकरता संबधीताची चढवण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्या. लोगो सारख्या चित्रांना प्रताधिकाराची सूचना दर्शविणे अपेक्षित आहे. त्याकरता {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरावा. या साच्यामुळे अशा संचिकांवर योग्य असःई प्रताधिकारदर्शक खूण/सूचना दिसएल आणि त्यांचे वर्गीकरण आपोआपच 'वर्ग:प्रताधिकारित संचिका' या वर्गात होईल. पुढील काळात प्रताधिकारित संचिका चढवताना कृपया या साच्याचा जरूर वापर करावा (आधी चढवलेल्या प्रतधिकारित संचिकांमध्येही हा साचा टाकल्यास उत्तम! :) ).
हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेले आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूर व विकिपीडिया लोगो पहा.
[संपादन] {{en:Template:Familytree}} हा इंग्रजी विकी वरील साचा मला मराठीत एक दोन ठिकाणी वापरायचा आहे. तो मराठीत कसा आणावा ?
[संपादन] मी इन्ग्लिश विकीपिडिया मधील लेखांचे मराठीत भाषांतर करु शकतो का?
- होय, आपण इन्ग्लिश विकिपीडिया मधील आपण आपल्याला आवडलेल्या कोणत्याही लेखांचे मराठीत भाषांतर करून मराठी विकिपिडियास भरीव मदत करू शकता.वर्ग:भाषांतर येथे भाषांतरीत करून हवे असलेल्या लेखांची यादी मिळेल. पहा नमस्कार नेहमीचे प्रश्न,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.
- हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~
[संपादन] Is it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा. can't it be simple and translated in day to day language?
- येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे,समर्पक आणि चपखल [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा. सहसा शब्द इतर मराठी संकेतस्थळांवर चर्चा झालेले असतात जसे कि टिचकी मारणे हा माऊस ने क्लिक करण्याकरता वापरला जातो.शास्त्रीय शब्द बर्याचदा नवखे असले तरी इंग्रजीतील शास्त्रीय शब्दसुद्धा त्याच्या व्याख्येशी निगडीत असतात ती व्याख्या माहीत होत नाही तो पर्यंत ते शब्दही रूळे पर्यंत नवखेच असतात असा एक मत प्रवाह आहे.परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्वांचा उपयोग अधिक श्रेयस्कर समजला जातो. विकिपीडिया वापरताना विकिसॉफ्टवेअर करिता जे शब्द वापरले गेले आहेत त्यांची व त्यांना कसे बदलावयाचे याची माहिती विकिसंज्ञा लेखात मिळेल.बाकीच्या ठिकाणचे शब्द तुम्ही तुमचेही बदलू शकता. आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.
[संपादन] महाराष्ट्रातील संस्थाविषयी चर्चा पानावर शंका आल्यास काय करावे?
बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्या प्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा.
त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> (UNIQ21fefc99572e56b3-nowiki-0000002A-QINU