विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/चहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:Essay

लघुपथ:
विपी:चहा

’चहा पिणे’ म्हणजे लाक्षणिक अर्थाने एखादे पेय पिणे आणि विचारपूस करणे. एकत्र बसून चहा पिऊ या असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा चहाच पितो असे नाही, तर तिथे चहाच्या ऐवजी कॉफी किंवा सरबतपण असू शकते. मराठी स्त्रिया चहा तसा कमीच पितात. पुरुष मात्र बहुधा दिवसातून अनेकदा. काही लोकांना दारू पिण्यात पुरुषार्थ वाटतो, तर काही पुरुषांना चहा पिण्यात. पण असा पुरुषार्थ वाटत नसेल तर चहाऐवजी शेकोटीपाशी बसून दुसरे काहीही पेय घेता येते. उष्ण प्रदेशात असाल तर लिंबूसरबत, लस्सी किंवा तसलेच एखादे सुंदरपैकी शीतपेय घ्यायला काहीच हरकत नाही.

सुंदर चहाचा एक कप
बैठक

एकदा सुंदर चहाचा एक कप व बैठक जमली की एका सुसंवादाला सुरुवात होते. अशा बैठकीत बसलेल्या इतर सदस्यांशी चांगला परिचय होतो आणि प्रत्येकाचे समाजातील स्थान आणि त्याने समाजाला केलेले योगदान याची कल्पना येते. चांगल्या विषयांवरील गप्पांमधून सुजाणभाव निर्माण होतो. " जर तुम्ही काही चांगले बोलू शकत नसाल तर बोलूच नका ", असा आदर्शवाद मनात बाळगणारी माणसे, बैठकीत विवाद होऊच देत नाहीत.

चहापानावरचा हा लेख ज्यांना आवडेल त्यांनी लेखाच्या चर्चापानावर केवळ शुभेच्छा देऊन थांबू नये. त्याहीपलीकडे जाऊन जेव्हा अत्युच्च चांगुलपणाची गरज भासेल तेव्हा कुठलीही औपचारिकता न दाखवता आपला अभिप्राय नोंदवावा.

"मला वाटते की, अमक्या व तमक्याने विकिपीडियावर फारच मेहनत घेतली, पण........." असे सांगण्याची आपणास ऊर्मी आलीच तर आपण ’पण’पूर्वीच थांबा. चांगला अभिप्राय देण्यासाठी पण/किंतु/परंतु/तरीही असल्या शब्दापूर्वीच लेखणी आवरती घ्यावी असा अलिखित संकेत आहे. फक्त चांगल्या अभिप्रायाचाच भाग तेवढा आपल्या हातातून कागदावर किंवा संगणकाच्या पडद्यावर उतरू द्यावा.

अभिप्रायाचे आपले ओतणे/टाकणे झाले की, आपणास {{पर्याय:विकिचहा}} हा साचा चर्चा पानावर लावणे आवश्यक वाटेल. आणि मग सर्वांना बोलावून सांगू या की ’चहा तयार आहे.चला घेऊ या.’

साचा:Barnstarpages

बैठक व सुंदर चहाचा कप कशासाठी आहे[संपादन]

  • ज्या योगदात्यांचे काय करावे असा आपल्याला सध्या प्रश्न पडला आहे, अशा आणि इतरही योगदात्यांबद्द्ल चांगल्या गोष्टी बोलण्यासाठी.
  • एखाद्या व्यक्तीविषयी वा तिच्या योगदानविषयी आपली पसंती जाहीररीत्या प्रगट करण्यासाठी.
  • इतर पानांवरील गरमागरम वादविवादांना इकडे वळविण्यासाठी.
  • रागावलेल्या लोकांच्या रागाला वाट करून देऊन त्यांना शांत करण्यासाठी.

बैठक व सुंदर चहाचा कप कशासाठी नाही[संपादन]

  • विवाद सोडविणे.
  • मध्यस्थी व लवाद.
  • मुजोरी.
  • संकेतस्थळावर नव्यानेच आलेल्यास चावण्यासाठी.(नवोदिताची कातडी नवजात बालकाप्रमाणे फारच कोवळी व मऊ असते, चावावयास त्रास होत नाही).
  • टवाळखोरीसाठी.
  • पैजेसाठी
  • १००% सकारात्मक नाही अशा इतर कोणत्याही गोष्टीसाठी..

चला तर ! पाणी उकळले आहे. दूध किती? साखर किती?[संपादन]

Tea ceremony performing 2.jpg

सप्टेंबर २००९[संपादन]

नरसीकरांनी दिलेल्या चहाच्या आमंत्रणाकरिता धन्यवाद. मागील महिन्याभरात नरसीकरांनी अनेक ठिकाणी पानांवर येऊन खूपच उत्साहाने त्यांचा सहभाग नोंदवला. अहो नरसीकर, आपल्यासोबत बसून घ्यावयच्या चहाची लज्जत वाढावी म्हणून मी मारी बिस्किटे आणली आहेत. Mahitgar १५:४२, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
चविष्ट मारी बिस्किटे

चहा चकली[संपादन]

कोणा निनावी सदस्याने मला चहाचे निमंत्रण पाठवले म्हणून येथे चक्कर टाकली. मस्त चहासाठी धन्यवाद. आता रिकाम्या हाताने कसे यायचे? मग ही घ्या थोडी चकली!

चकली

अभय नातू १७:०९, १४ मार्च २०१० (UTC)

चहा चकली मारी बिस्किटे[संपादन]

  • मलाही कोणा निनावी सदस्याने चहाचे निमंत्रण पाठवले म्हणून येथे आलो. धन्यवाद. चहा, चकली, मारी बिस्किटे यांचा आस्वाद घेताना मजा आली.

विनोद रकटे २३:३८, १४ मार्च २०१० (UTC)

  • चहा विदर्भातही लोकप्रिय आहेच. मलाही आवडला, त्यातील आपलेपणाचा स्वाद जास्त आवडला. सोबत एखादे गाणे जमले तर बहार. Gypsypkd ०५:२०, १५ मार्च २०१० (UTC)

बटाटेपोहे/कांदेपोहे[संपादन]

४-५ दिवस कामात अतिशय गर्क होतो. आलो, तर चहाचे निमंत्रण मिळाले. काही वादावादी/वैचारिक मतभेद वगैरे झाले की काय? म्हणून चहाचे निमंत्रण आले? बाटाटेपोहे/कांदेपोहे, त्यावर थोडा चिवडा, वर मस्तपैकी झननन(तिखट)(हा खास वर्‍हाडी शब्द आहे) चण्याची तर्री , बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे हे चहाआधी माझेकडे लागले. किमानपक्षी मिसळ तर आहेच. या तर सर्वजण. अहो ! खरेच या. येणारच असाल तर मग नुसते पोहे कशाला? पुरणपोळीचा पण बेत करू शकतो. वाटलेच तर, डाळवडे, पंचामृत, कैरीचे पन्हे, कांदाभजी, मसालेभात, साजूक तुप, भटईची(एकप्रकारचे लहान वांगे) मसाला भाजी, कांदे-कैरीचे लोणचे, जवसाची चटणी, काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर इत्यादींपैकी काहीही. शिवाय घोळीची भाजी जरूर करतो म्हणजे घोळ संपेल. कळवा मग तसे. एकदा वैदर्भीय पाहुणचार तर घेऊन बघा. आग्रहाचे निमंत्रण आहे बरे.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४३, १५ मार्च २०१० (UTC)


चहाबद्दल धन्यवाद.मनोज ०८:१०, २५ मार्च २०१० (UTC)

चहाचा अजून एक round! अर्थात चहा पिण्यास आपण कधीही तयार ! यावरून आठवले की चहाला नाही म्हणू नये असे आमची आजी म्हणायची. यातील चहा शब्दाचा अर्थ तिला पेय तसेच विचारपूस (त्यांची चहा केली) असाही अभिप्रेत होता हे बरेच उशीरा कळले.
अभय नातू ०८:१६, २५ मार्च २०१० (UTC)
टी साठी चहा हा त्यावरूनच तर आला नसावा? -मनोज ०८:२६, २५ मार्च २०१० (UTC)
आलुपोहे घ्या आलु पोहे
  • आलुपोहे?? हा कोणता पदार्थ?? आळूची भाजी?? पोह्यांसोबत??असे काही आहे का?? आपण खुलासा केलात तर बरे होईल. काय आहे मी एक खादाड माणूस आहे (खवैय्या वगैरे तत्सम शब्दप्रयोग मला अगदीच मिळमिळीत वाटतात म्हणून ) आणि निरनिराळे पदार्थ करून खायला आवडतात आता विषय निघालाच आहे तेव्हा हे असे पदार्थ कसे करतात ते कृपया सांगावे.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार १२:३६, २२ जुलै २०१० (UTC)
हे तर छानच, तर मग, चहा सोबत हे आलुपोहे घ्या, आलु पोहे !
माहितगार १४:१६, २२ जुलै २०१० (UTC)

सप्टेंबर २०११[संपादन]

फरसाण, तुमच्यासाठी

सर्वप्रथम, चहाबरोबर थोडेसे फरसाण आणले आहे.

या चहाबैठकीतील अनेक उद्देशांपैकी एक आहे --

  • एखाद्या व्यक्तीविषयी वा तिच्या योगदानविषयी आपली पसंती जाहीररीत्या प्रगट करण्यासाठी.

तर मग मला म्हणायचे आहे की सागर मार्कळांचे लेखन, त्यांचे उपग्रहांबद्दलचे ज्ञान व त्याबद्दलचे योगदान याबद्दल मला कौतुक आहे.

तसेच संकल्पचे गेल्या अनेक वर्षांचे योगदान, मराठी विकिपीडियाच्या विकासाबद्दलची तळमळ आणि त्यासाठी त्याच्या (प्रसंगी स्वतःकडे वाईटपणा घेउनही केलेल्या) स्पष्टोक्ती यांबद्दल मला कौतुक वाटते.

आणि हे सांगणे नलगे की आपले कितीही मतभेद, वादावाद्या झाल्या तरीही आपण सगळे येथे एकाच ध्येयासाठी आलेलो आहोत आणि त्यासाठी पडेल ते काम करण्याची आपली तयारी आहे.

अभय नातू ०३:०८, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

दिवाळीचा विकिफराळ २०१३[संपादन]

  • {{साद|}} एका साद साचात पाचच सदस्य नावे मावत असल्यामुळे प्रत्येकी पाच संख्येनंतर वेगळा साचा लावावा.
  • दिपावलीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा.

@V.narsikar, अभय नातू, J, Abhijitsathe, Katyare: @संतोष दहिवळ, Bodkhe, Salveramprasad, Dr.sachin23, Prabodh1987: @Sankalpdravid, Heramb:

  • मराठी विकिपीडियावर अशात संपादन करू लागलेल्या पुढील नवीन संपादकांनाही मन:पुर्वक शुभेच्छा

@Mahendra pagar, Minalshamgule, दामले श्रीपाद शंकर, मुकुंद जोगळेकर, Ek motivator: @Prakashredgaonkar, Rajsewak, शरद वागळे, दामले श्रीपाद शंकर, Sarkar: @दिपाली परिचारक, PRAMODTHAKARE555, अशोक बनसोडे, समस्त मराठी विकिपीडिया परिवारास आमंत्रण चालू:

फरसाण, तुमच्यासाठी
लाडू, तुमच्यासाठी
खीर, तुमच्यासाठी

काय लोकं आहेत हो या विकिवर. येवढी दिवाळी उलटून गेली पण कोणीही(माझ्यासह) कोणास विकिफराळास बोलविले नाही.येणे न येणे हा भाग सोडा ! निदान निमंत्रण तर द्यायचे ! भावनिक बंध लोपून रुक्षता वाढत चालली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. असो. सहज गंमत म्हणून हा प्रपंच.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:१६, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)

उपवासा करीता चमचमीत साबुदाणावडा, तुमच्यासाठी
उपवासा करीता केळीसुद्धा, तुमच्यासाठी


नरसिकरजी मला वाटते मिळाली सुट्टी तर संपादनाची आणि लिहिण्याची भूक भागवून घेण्यात प्रत्येकजण तन्मयतेने रंगले होते म्हणून दिवाळी फराळाचेही भान राहीले नाही.पण खरतर नव्या {{साद|}} साचामुळे चहा-फराळाकरता साद देणे आता अंमळ सोपे झाले आहे.सध्या अशात कार्यरत दिसलेल्या काही सदस्यांची नावे साद साचात वर जोडतो आहे. विकिपीडिया मुक्त आहे तेव्हा हेच सर्वांनी दिवाळी २०१३ च्या फराळाचे निमंत्रण समजणे आणि अजून कुणाची आठवण आली आणि साद द्यावी वाटली तर साद साचात सदस्य नाव जोडा संबंधीत सदस्य विकिपीडियावर येतील त्यांना साद आपोआपच जाईल.
आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो, आणि दिपावलीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१३, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)