विकिपीडिया:सद्य घटना/मार्च २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्च २००९
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. १९ एप्रिल २०२४, शुक्रवार


दि. ३१.०३.२००९[संपादन]

दि. ३०.०३.२००९[संपादन]

दि. २९.०३.२००९[संपादन]

दि. २८.०३.२००९[संपादन]

दि. २७.०३.२००९[संपादन]

दि. २६.०३.२००९[संपादन]

दि. २५.०३.२००९[संपादन]

दि. २४.०३.२००९[संपादन]

दि. २३.०३.२००९[संपादन]

दि. २२.०३.२००९[संपादन]

दि. २१.०३.२००९[संपादन]

दि. २०.०३.२००९[संपादन]

दि. १९.०३.२००९[संपादन]

दि. १८.०३.२००९[संपादन]

दि. १७.०३.२००९[संपादन]

दि. १६.०३.२००९[संपादन]

दि. १५.०३.२००९[संपादन]

दि. १४.०३.२००९[संपादन]

दि. १३.०३.२००९[संपादन]

दि. १२.०३.२००९[संपादन]

दि. ११.०३.२००९[संपादन]

दि. १०.०३.२००९[संपादन]

दि. ०९.०३.२००९[संपादन]

'पालकांना वा-यावर सोडाल, तर खबरदार!'
मुंबई - पालक बरे झाल्यावरही त्यांना मेंटल हॉस्पिटलमधून न नेणाऱ्या मुलांवर पोलिसी कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा कायदा यंदाच्या एक मार्चपासून अमलात आला आहे. या कायद्यानुसार, पालकांची प्रकृती सुधारल्यावरही त्यांना घरी नेण्यात काचकुच करणाऱ्या मुलांवर तीन वर्षे तुरुंगवास आणि अथवा पाच हजार रूपये दंड शिक्षा ठोठावण्याची तरतुद या कायद्यात आहे. याची माहिती देणारे फलक हॉस्पिटलच्या बाहेर लावण्यात येणार आहेत.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्वसाधारणपणे मनोरूग्णावर तीन ते चार महिने उपचार केले की तो घरी जाण्याइतका सुधारतो. पण अनेक रुग्णांबाबत ते त्याहून कितीतरी अधिक काळ हॉस्पिटलमध्येच आहेत, कारण त्यांच्या घरचे त्यांना नेण्यास फिरकतच नाहीत.

आपल्या घरचा माणूस अशा हॉस्पिटलमध्ये होता हे सांगण्यात त्यांना कमीपणाचे वाटते असे हे अधिकारी म्हणाले. यावर आणखी एक उपाय म्हणून, रुग्णाला दाखल करून घेताना, त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या घरच्या पत्त्याची पडताळणी केली जाईल. अशा नातेवाईकांकडे रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.गेल्या वर्षी २५ रूग्णांच्या नातेवाईकांनी खोटा पत्ता दिल्याचे आढळले आहे.

नातेवाईकांनी आपल्या रूग्णाला आठवड्यातून एकदा तरी भेटणे आवश्यक केले जाईल असे हे अधिकारी म्हणाले. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५३ रूग्ण हे २० वर्षांहून अधिक काळ ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. १८५ जण हे १० ते २० वर्षे आहेत, १३२ ५ ते १० वर्षे आहेत आणि १०२ रूग्ण हे एक ते दोन वर्षे आहेत.

म.टा.

दि. ०८.०३.२००९[संपादन]

भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ विजय
भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ विजय
भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ विजय
ख्राईस्टचर्च - सचिन तेंडुलकरच्या (१६३) ‘मास्टर ब्लास्टर’ खेळीच्या जोरावर भारताने आज रोमहर्षक ठरलेल्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली व मालिका गमावणार नाही, याची हमीच दिली. व्हेटोरीच्या जागी न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेंडन मॅक् क्युलमने प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या भारताने ४ बाद ३९२ धावांची भक्कम मजल मारली आणि यजमान संघाचा डाव ४५.१ षटकात ३३४ धावांवर संपुष्टात आणला. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतील ४३वे शतक साजरे करताना ‘लाजवाब’ खेळी केली. न्यूझीलंड भूमीत पहिलेच एकदिवसीय शतक झळकावणाऱ्या सचिनला मात्र जखमी झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले.
लोकसत्ता

दि. ०७.०३.२००९[संपादन]

दि. ०६.०३.२००९[संपादन]

दि. ०५.०३.२००९[संपादन]

दि. ०४.०३.२००९[संपादन]

दि. ०३.०३.२००९[संपादन]

पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर खूनी हल्ला
लाहोर - दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळण्यास जाणार्‍या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका क्रिकेट संघावर १२ व्यक्तींनी ए.के. ४७ बंदूकांसह हल्ला चढवला. पाच सुरक्षासैनिक व दोन नागरिक यात मृत्यू पावले. श्रीलंकेच्या पाच खेळाडूंसह अनेक जखमी झाले आहेत.
विकिन्यूझ

दि. ०२.०३.२००९[संपादन]

लोकसभा निवडणुक १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान
लोकसभा निवडणुक १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान
लोकसभा निवडणुक १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान
नवी दिल्ली - निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी आज (सोमवारी) भरगच्च पत्रकार परिषदेत लोकसभा-२००९ निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

लोकसभेची निवडणुक १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान एकूण पाच टप्प्यात होणार असून त्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. नवीन लोकसभा २ जून २००९ पुर्वी अस्तित्त्वात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात १६ एप्रिल, दुसर्‍या टप्प्यात २३ एप्रिल, तिसरा टप्प्यात ३० एप्रिल, चौथ्या टप्प्यात ७ मे आणि पाचव्या व अंतिम टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी १६ एप्रिल, २३ एप्रिल आणि ३० एप्रिल या तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ एप्रिलरोजी विदर्भ दहा आणि मराठवाड्यातील तीन जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलरोजी मराठवाड्यातील पाच जागांसह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून २५ जागांसाठी मतदान होईल तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह उर्वरीत सर्व जागांसाठी मतदान होणार असल्याची माहीती निवडणुक आयोगाने दिली आहे.

देशभरात एकूण ८ लाख २८ हजार ८०४ मतदान केंद्रांमध्ये ही निवडणुक पार पडणार आहे. निवडणुकीसाठी ४० लाख सरकारी कर्मचारी तसेच २१ लाख पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

देशभरातील शाळा-कॉलेजच्या सुट्टयांचा विचार करून निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याचे गोपालस्वामी यांनी स्पष्ट केले. ७१ कोटी ४३ लाख मतदार असून ५२२ मतदार संघातून ओळखपत्र देण्यात आल्याची माहीती गोपालस्वामी यांनी दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांतील निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या असून या निवडणुका मे-जून मध्ये घेतल्या जाणार आहेत.

सकाळ

दि. ०१.०३.२००९[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]