विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/अनुभव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)







तुम्ही भाषांतर कसे करता ?[संपादन]

तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?[संपादन]

  1. ऑनलाइन शब्दकोश यादी आणि त्या यादीतील नित्योपयोगी संकेतस्थळे माझ्या ब्राउझर मध्ये आवडती म्हणून जतन केली आहेत (Favorites) तसेच मी फायरफॉक्स सुविधाही वापरतो.माहीतगार ०६:३५, २१ सप्टेंबर २००९ (UTC)
    1. माझा सध्याचा साधारण शब्दांकरिता क्रम :प्रथम http://www.marathibhasha.org/ क्वचीत ई-शब्दकोश. ई-शब्दकोशाने समाधान नाही झाले तर खांडबहाले किंवा समसंभाषण कोश, क्वचित वझे कोश, आणि गरजेप्रमाणे शब्दबंधवर समानार्थी शब्द मिळतो का ते पहाणे असा आहे.
  2. संगणकविषयक शब्द असल्यास विकिसंज्ञा , ट्रान्सलेट विकि , FUEL, Microsoft किंवा KDE असे गरजेप्रमाणे.
  3. नवा मराठी शब्द बनवून उपयोग करण्याची गरज भासल्यास शब्दाचा इंग्रजीतील अर्थ इंग्रजी विक्शनरीवर पाहणे. फक्त शब्दार्थ न पुरल्यास google वर define: म्हणून व्याख्या-शोध घेतो. तसेच Etymology म्हणून इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती बघतो. इंग्रजी शब्द ज्या लॅटिन किंवा इतर धातूपासून किंवा शब्दापासून आला असल्यास त्या मूळ शब्दास मराठी आणि संस्कृत काय पर्याय आहेत यांचा शोध घेतो. काही प्रत्ययांचाही आधार घेता येतो का ते पहातो. एवढे करून न जमल्यास शब्दाच्या उपयोगाला धरून काही शब्द सुचतो का ते पहातो. अर्थात हे करताना वाचकाला समजणार आहे का, उच्चारण्यास व लक्षात ठेवण्यास सोपे आहे का ते पहातो. यात इंग्रजी शब्द वापरूच नये असा कुठेही आग्रह ठेवत नाही. तसेच आपण वापरलेले शब्द लेखाच्या खाली नोंद करतो म्हणजे कुणालाही तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला ते पडताळता येते. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:४३, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

मदत हवी आहे ![संपादन]

  • माझी शंका
  • मी एका मासिकाच्या निमित्ताने इंग्रजीतून मराठीत भाषांतर करत असते. आणि नंतर ते सोशल मिडीयावरही नियमितपणे प्रसृत करत असते. तत्त्वज्ञान, अध्यात्म, आणि व्यावहारिक जीवन यांच्याशी संबंधित असे ते लिखाण असते. असे भाषांतरित लिखाण या प्रकल्पात कुठे जतन करता येईल का?

- केतकी मोडक



  • माझी शंका

मी मराठी माध्यमातून अभ्यास करणारे विद्यार्थी अथवा केवळ मराठी लिहिता वाचता येणार्‍यासाठी इंग्रजी भाषेत उपलब्ध पानांचे अनुवाद करू इच्छितो.


  • माझे प्रश्न
  1. समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल? उत्तरे समाधानकारक आहेत
  2. कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय? (उत्तर : होय मुभा आहे; सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समाधानकारक आहेत
  3. मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे? (सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समाधानकारक आहेत
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Newkelkar १६:०६, १३ डिसेंबर २००९ (UTC)~~

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प[संपादन]

आपण विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पाहिला आहे काय , त्यात कदाचित अधिक माहिती उपलब्ध आहे असे आढळेल; पायरी गणिकसुद्धा माहिती आंतर्भूत करावयास आवडेल. पण पायरी गणिकमध्येसुद्धा काय अभिप्रेत आहे याची कल्पना दिलीत तर बरे होईल. मी येथे थोडासा प्रयत्‍न करतो आहे, काही शंका राहिल्यास जरूर विचाराव्यात.
  1. स्वतःच्या सदस्यपानावर इंग्रजीमधून मराठी भाषांतर करण्यात स्वारस्य असल्यास {{भाषांतरकार|en|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} किंवा {{भाषांतरकार|hi|mr}} असे साचे लावू शकाल. त्याशिवाय विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/सहभागी सदस्य येथे स्वतःची नोंद केल्यास इतर भाषांतरकारांशी समन्वय साधणे सोपे जाईल. अर्थात, हे बंधनकारक नाही. ही पायरी वगळून तुम्ही पुढे जाऊ शकता.
  2. आपल्याला वर्ग:भाषांतर येथे भाषांतर करून हवे असलेल्या पानांची सध्याची यादी उपलब्ध होईल . आपण विकिपीडियात प्रथमच संपादन करणार असल्यास कदाचित अभाषांतरित लेखनातील एखादा उतारा भाषांतर करून जतन केलेला असल्यास इतरांनाही सहभागी होऊन आपले काम पूर्णत्वास नेण्यासाठी सहयोग देता येईल. अशामुळे आपल्याला विकिपीडीया लेखन शैलीचा अंदाज येईल. अर्थात, असे करणे बंधनकारक नाही. आपण ही पायरी टाळून सरळ पुढील पायरीवर जाऊ शकता.
  3. आपल्याला इंग्रजी, हिन्दी किंवा इतर भाषेतील विकिपीडियाच्या पानांचे भाषांतर मराठी विकिपीडियावर आणावयाचे झाल्यास:- सविस्तर उत्तर खालील स्वतंत्र विभागात पहावे.
  4. आपल्याला विकिपीडियेतर स्रोतातील लेखाचे भाषांतर करावयाचे झाल्यास, प्रथमतः स्वतःला खालील प्रश्न विचारा -
    1. हे माझे स्वतःचे इतरभाषी लेखन आहे; त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते लिखाण मला मराठी भाषेत आणावयाचे आहे का?
      1. ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे मराठीत आणावयाचे असल्यास आणि इतरांनी त्यात बदल कमीत कमी करून हवे आहे का? असे असल्यास ते शक्यतो b:विकिबुक्स या सहप्रकल्पात न्यावे व तेथे वर्गःविकिस्रोत असे वर्गीकरण करावे. आपण हे लेखन प्रताधिकारमुक्त करत असल्याचे चर्चा पानावर लिहून आपले नाव व परिचय नमूद करावा.
      2. ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे ठेवणे गरजेचे नसून ते विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीत आणून इतरांनीसुद्धा त्या लेखनात, भाषांतरात आणि संपादनात सहयोगी करावा असे अपेक्षित असल्यास, ते भाषांतरित लेखन आपण मराठी विकिपीडियावर ठेवू शकता. अधिक माहिती विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा येथे पहावी.
        1. विकिपीडियावर लिहिताना लेखाचे शीर्षक मराठी भाषेतच असावे असा संकेत आहे. अधिक माहिती विकिपीडिया लेखन संकेत येथे पहावी.
    2. स्वतःचे नसलेल्या लेखनाचा मराठीत अनुवाद करावयाच्याआधी प्रताधिकार मुक्तिप्रकल्प येथे अधिक माहिती घ्यावी
  5. तुम्हाला भाषांतरास अधिक कालावधी लागणार असल्यास किंवा लेख ४ परिच्छेदापेक्षा मोठा असल्यास, लेखाचे शीर्षक निवडल्यानंतर तापुरत्या स्वरूपात लेख लेखाचे नाव/धूळपाटी असे साठवू शकता अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी इतरांची दखल कमी हवी असल्यास स्वतःचे सदस्यनाव सदस्य:स्वतःचे सदस्य नाव/धूळपाटी येथेसुद्धा लेखन जतन करू शकता. आपले काम कमी परिच्छेदांचे असल्यास विकिपीडिया:धूळपाटीचा उपयोग करण्याचाही विचार करता येईल.
  6. तुम्ही ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाबद्दल एखादा लेखन समन्वय प्रकल्प असण्याची बर्‍याचदा शक्यता असते. लेखन समन्वय प्रकल्पात वेळ वाचण्याच्या दृष्टीने (बंधनकारक नसलेले) लेख वा आराखडे उपलब्ध असणे संभवते
  7. ज्या नवीन लेखपानावर भाषांतर सुरू करत आहात त्या लेखात {{भाषांतर}} किंवा {{अनुवाद}} साचा लावावा म्हणजे भाषांतर पानात सहयोग हवा आहे हे इतर सदस्यांनाही समजते तसेच भाषांतरअत सहयोग असलेल्या वर्गीकरणात लेखाची नोंदही होते.
  8. लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात वापरलेली संज्ञा}} साचा लावण्याबद्दल विचार करावा. त्यामुळे लेखात इंग्रजी शब्दाकरिता मराठीत कोणता शब्द वापरला आहे याची यादी उपलब्ध करता येते. तसेच लेखात एखादा मराठी शब्द विशिष्ट अर्थच्‍छटेने योजल्यास अशा शब्दापुढे {{विशिष्ट अर्थ पहा}} साचा लावण्याचा विचार करावा आणि अर्थच्‍छटा शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा असा वेगळा विभाग लेख तळात {{पर्याय:लेखात वापरलेली संज्ञा}} ने तयार झालेला असेल तेथे नमूद करावे.
  9. शक्यतोवर लेखाचा पहिला परिच्छेद आणि ==चिन्हात दिलेली विभाग/परिच्छेद नावे== प्राधान्याने मराठीत आणावी म्हणजे सहयोग देणार्‍या इतर सदस्यांना अधिक उत्साह वाटू शकतो.
  10. भाषालेखनाबद्दल सांगावयाचे झाल्यास, प्रथम भाषांतर आणि लेखन करा आणि नंतर विकिपीडिया:लेखनभाषा संकेतला अनुसरून काही बदल करावयाचे झाल्यास पहावे. तेथे लेखन संकेताबद्दल चर्चासुद्धा करू शकता.
  11. पर्यायी मराठी शब्दांची गरज असल्यास {{मराठी शब्द सुचवा}} साचा लावावा तो [मराठी शब्द सुचवा] असा दिसेल किंवा ऑनलाइन शब्दकोशांची यादीच्या सहाय्याने इंटरनेटवर आपण इंग्रजी-मराठी शब्दांचा शोध घेऊ शकता. नवीन मराठी शब्द कसे बनवावेत याबद्दल तुम्ही चपलख मराठी शब्द कसे शोधता? येथे काही साहाय्य उपलब्ध आहे.
  12. विकिपीडियात नेहमी लागणारे शब्द,पद आणि वाक्य संचय वापरा आणि त्यांत भर घालत रहा.
  13. मराठी भाषेकरिता मशिनी भाषांतरणाची सोय अद्याप नसली तरीसुद्धा त्या बद्दल अधिक माहिती मशिन ट्रान्सलेशन येथे उपलब्ध आहे.
  14. आणि आपण भाषांतर कसे करता याचे अनुभव इतरांना उपयोग व्हावा म्हणून अनुभव येथे आवर्जून नोंदवा.
  15. नेहमीचे प्रश्न
    1. मी ऑफलाइन भाषांतर करून येथे आणू शकतो काय ?
      1. ऑफलाइनपेक्षा विकिपीडियावरच ऑनलाइन भाषांतर करणे जमल्यास लेखाचा इतिहास वाचून मशिन ट्रान्सलेशन क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांना याचा उपयोग होणे संभवनीय आहे याची नोंद घ्यावी.
    2. मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
      1. जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय विश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.

माहितगार ०८:१२, १४ डिसेंबर २००९ (UTC)

उ. मदत हवी आहे ![संपादन]

#समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल?
इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत एखादा लेख अनुवादताना काय पद्धत अवलंबावी याबद्दल माहिती देणारे सहाय्यपान सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु, खाली नोंदवलेले, अनुवादताना उपयुक्त पडतील असे मुद्दे आपल्याला सुचवू इच्छितो :
  • इंग्लिश / परभाषेतील विकिपीडियावरील अनुवाद करण्याजोग्या लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी विकिपीडियावरील समांतर लेखाचा दुवा असल्यास शोधणे. असा दुवा मिळाल्यास, आपल्याला मराठीत आणावयाच्या लेखाचे पान अगोदरच बनवले गेले असेल. मराठी विकिपीडियावरील त्या संबंधित लेखामध्ये आवश्यक त्या मजकुराचा अनुवाद करून तो लेख विस्तारायला आपण मदत करू शकता.
  • इंग्लिश / परभाषेतील लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी लेखाचा दुवा नसेल, तर मराठी विकिपीडियावर समानार्थी शीर्षकाचा शोध (शोधपेटी वापरून) घ्यावा. तरीही संबंधित शीर्षक न सापडल्यास त्या शीर्षकाचा नवीन लेख बनवावा आणि परभाषेतील मजकूर अनुवादण्याचे काम आरंभावे.
  • छोट्या - छोट्या परिच्छेदांचा अनुवाद जोडत मराठी लेखात भर घालू शकता. किंवा परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
  1. मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय विश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
  1. मी अर्धवट अनुवादित केलेले पान साठवून कसे ठेवायचे / नंतर ते प्रसिद्ध कसे करावे?
अर्धवट अनुवादित केलेले पान साठवून ठेवायची अशी खास सोय विकिपीडियावर नाही. तुम्ही जेवढा अर्धवट अनुवाद लिहिला असेल, तेवढा अंशात्मक स्वरूपात विकिपीडियावरील लेखात साठवू शकता आणि त्यात हळूहळू नव्या परिच्छेदांची भर घालू शकता. किंवा वर सांगितल्याप्रमाणे परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
मराठी विकिपीडियावर आपण कोणत्याही प्रकारे घेतलेल्या विधायक सहभागाचे स्वागतच आहे. अजून काही शंका असल्यास येथे किंवा चावडीवर विचारू शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:५०, १३ डिसेंबर २००९ (UTC)