वांद्रे-वरळी सागरी महामार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नकाशा

वांद्रे-वरळी सागरी महामार्ग (राजीव गांधी सेतू) हा आठ मार्गिका असलेला मुंबईतील महामार्ग आहे. हा महामार्ग जून ३०, इ.स. २००९ रोजी खुला झाला.

या महामार्गाने मुंबईतील वांद्रेवरळी हे भाग जोडले जातील. सध्या या वांद्र्याहून वरळी (किंवा उलट दिशेने) जाण्यासाठी ६०-७५ मिनिटे लागतात, ती या मार्गामुळे ७-१० मिनिटे होण्याचा अंदाज आहे.[१] याचा मोठा भाग समुद्रावरील पूल असून मुख्य भाग केबल-स्टेड[मराठी शब्द सुचवा] प्रकाराने बांधण्यात आला आहे. १६ अब्ज रुपये खर्च झालेला हा महामार्ग हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून याची योजना डी.ए.आर. कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केली होती.

हा महामार्ग पश्चिम द्वीप महामार्गाचा एक भाग आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Bandra-Worli sea link extended up to Haji Ali