ल्यों
| ल्यों Lyon |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| प्रदेश | रोन-आल्प | ||
| विभाग | रोन | ||
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ४३ | ||
| क्षेत्रफळ | ४७.९५ वर्ग किमी | ||
| समुद्रसपाटीपासुन उंची | ८९ फूट | ||
| लोकसंख्या (२००८) | |||
| - शहर | ४,८३,१८१ | ||
| - घनता | १०,०७७ प्रति वर्ग किमी | ||
| - महानगर | १४,२२,३३१ | ||
| प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
| lyon.fr | |||
| फ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
ल्यों (फ्रेंच: Lyon;
उच्चार ; इंग्लिश: Lyons, लायान्झ) हे फ्रान्स देशामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर व महानगर आहे. हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील रोन-आल्प प्रदेशाच्या रोन विभागात रोन नदीच्या काठावर वसले असून ते पॅरिसपासून ४७० किमी, मार्सेलपासून ३२० किमी तर जिनिव्हापासून १६० किमी अंतरावर स्थित आहे. २००८ साली ल्यों शहराची लोकसंख्या जवळजवळ ५ लाख तर शहरी भागाची लोकसंख्या १४.२२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.५७ लाख इतकी होती. रोन-आल्प प्रदेश व रोन विभाग ह्या दोन्हींची प्रशासकीय राजधानी ल्यों येथेच आहे.
अनेक ऐतिहासिक वास्तू व इमारती असलेले ल्यों शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. आजच्या घडीला ल्यों हे फ्रान्समधील दुसर्या क्रमांकाचे मोठे आर्थिक केंद्र असून येथे अनेक सॉफ्टवेर, बायोमेडिकल व औषधे बनवणार्या कंपन्या तसेच अनेक बँका स्थित आहेत. २०१० साली नवनवे शोध लावणारे ल्यों हे फ्रान्समधील दुसरे तर जगातील ननव्या क्रमांकाचे शहर होते.
इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तसेच आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेचे मुख्यालय ल्यों येथेच आहे. ऑलिंपिक लॉन्नेस हा लीग १ मध्ये खेळणारा फ्रेंच फुटबॉल संघ ल्यों येथील स्थानिक संघ आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास[संपादन]
भूगोल[संपादन]
शहररचना[संपादन]
वाहतूक[संपादन]
कला[संपादन]
शिक्षण[संपादन]
खेळ[संपादन]
अर्थव्यवस्था[संपादन]
जुळी शहरे[संपादन]
ल्यों युरोपाच्या परिषदेच्या आंतरसांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या शहरांपैकी एक आहे. ल्योंचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[१]
संदर्भ[संपादन]
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
- ↑ १.०० १.०१ १.०२ १.०३ १.०४ १.०५ १.०६ १.०७ १.०८ १.०९ १.१० १.११ १.१२ १.१३ १.१४ १.१५ १.१६ Partner Cities of Lyon and Greater Lyon.
- ↑ Partner Cities.
- ↑ Sister Cities of Guangzhou.
- ↑ Frankfurt -Partner Cities.
- ↑ Leipzig – International Relations.
- ↑ Official Yokohama City Tourism Website: Sister Cities.
- ↑ Twin Cities.
- ↑ Yerevan Municipality – Sister Cities.
- ↑ Milano – Città Gemellate.
- ↑ Twin towns of Minsk.
- ↑ Montreal partner city.
- ↑ Saint Petersburg in figures – International and Interregional Ties.
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी)
- व्यापार दालन (फ्रेंच)
- पर्यटन (इंग्रजी)
विकिव्हॉयेज वरील ल्यों पर्यटन गाईड (इंग्रजी)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |