लोंझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोंझा हा महाराष्ट्रातील किल्ला आहे. अनेक शतकांनतर या किल्ल्याचा शोध २०१२ साली गूगल अर्थ ह्या उपयोजन सॉफ्टवेअरमुळे लागला.[१]

चाळीसगाव-सिल्लोड रस्त्यावरील नागद गावाजवळ हा किल्ला आहे. महादेव टाका डोंगर म्हणून हा भाग ओळखला जातो. या डोंगरावर पाण्याच्या १० टाक्या असून सर्वात मोठ्या टाकीची रुंदी ५८ फूट, तर लहान टाक्यांची रुंदी २० फुटांच्या आसपास आहे. पश्चिमेला ४० फूट रुंद, ३८ फूट लांब आणि सहा फूट उंच अशी गुहा आहे. गुहेचा मार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलेला असून डाव्या बाजूला पाच खांब असलेले गुहाटाके आहेत. या गुहेत अलीकडच्या काळातील एक शिवलिंग आहे. या डोंगराच्या माथ्यावर जोत्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या कोपऱ्याकडील भिंती आजही तग धरून आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या पूर्वेस सलग तटबंदीचे अवशेष आढळले. त्यातला बराच भाग मातीमुळे झाकलेला आहे. तटबंदीचा दगड घडीव आहे.

संदर्भ[संपादन]