लीनस तोरवाल्ड्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| लीनस तोरवाल्ड्स | |
|---|---|
लीनस तोरवाल्ड्स (इ.स. २००२ साली) |
|
| जन्म | डिसेंबर २८, १९६९ हेलसिंकी, फिनलंड |
| राष्ट्रीयत्व | फिनिश |
| शिक्षण | एम.एस., संगणकशास्त्र |
| पेशा | संगणक |
| जोडीदार | तोव तोरवाल्ड्स |
| वडील | निल्स तोरवाल्ड्स |
| आई | आना तोरवाल्ड्स |
| पुरस्कार | ताकेदा पुरस्कार, जपान |
लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds;
उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याच्या मूळ विकसक म्हणून ख्यातनाम असलेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासामध्ये व वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
तोरवाल्ड्स यांना अँड्र्यू टॅननबॉम यांनी विकसवलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.