र्हाइन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
र्होन नदी याच्याशी गल्लत करू नका.
| ऱ्हाइन | |
ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील ऱ्हाईनचे पात्र |
|
| उगम | टोमासे, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड २,३४५ मी. |
| मुख | रॉटरडॅम, उत्तर समुद्र |
| लांबी | १,२३३ कि.मी. |
| देश | स्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स |
| सरासरी प्रवाह | बासेल: १,०६० स्त्रासबुर्ग: १,०८० क्यॉल्न: २,०९० डच सीमा: २,२६० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | १,८५,००० किमी² |
ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.
जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.
मोठी शहरे[संपादन]
बासेल
शाफहाउजन
स्त्रासबुर्ग
कार्ल्सरूह
मानहाइम
लुडविक्सहाफेन
वीसबाडेन
माइंत्स
कोब्लेंत्स
बॉन
क्योल्न
लेफेरकुसन
ड्युसेलडॉर्फ
ड्युइसबुर्ग
आर्नहेम
नेमेगन
युट्रेख्त
रॉटरडॅम
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |