रोखा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोखा (इंग्लिश: Security, सिक्युरिटी), अर्थात प्रतिभूती (मराठी लेखनभेद: प्रतिभूति) हा वित्तीय मूल्य दर्शवणारा विनिमय करण्याजोगा, परक्राम्य[१] वित्तीय संलेख[२] असतो. रोख्यांचे ढोबळ मानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण होते :
- कर्ज रोखे (डेट सिक्युरिटीज): बँकेच्या नोटा, बंधपत्र (बाँड), ऋणपत्र (डिबेंचर) इत्यादी.
- समन्याय रोखे (इक्विटी सिक्युरिटीज): उदा., समभाग.
- अनुजात कंत्राटे (डेरिवेटिव काँट्रॅक्ट): वायद्याचा करार (फॉरवर्ड), वायदा सौदा (फ्यूचर), विकल्प करार (ऑप्शन), अदलाबदलीचा करार (स्वॉप) इत्यादी.
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ↑ परक्राम्य (इंग्लिश: Negotiable, निगोशिएबल) (संदर्भ: अर्थशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, पृ. ४१४. (मराठी मजकूर) )
- ↑ संलेख (इंग्लिश: Instrument, इन्स्ट्रुमेंट) (संदर्भ: अर्थशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, पृ. २७९. (मराठी मजकूर) )
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |