राहुल द्रविड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहुल शरद द्रविड (जन्म जानेवारी ११, इ.स. १९७३, इंदूर, मध्य प्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इ.स. १९९६ मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.

राहुल द्रविड
RahulDravid.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव राहुल शरद द्रविड
जन्म जानेवारी ११, इ.स. १९७३ (1973-01-11) (वय ३९)
इंदूरमध्य प्रदेश),भारत
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफस्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१५७) २० जून १९९६: वि इंग्लंड
शेवटचा क.सा. १८ ऑगस्ट २०११: वि इंग्लंड
आं.ए.सा. पदार्पण (३३९) ३ एप्रिल १९९६: वि श्रीलंका
शेवटचा आं.ए.सा. १६ सप्टेंबर २०११:  वि इंग्लंड
एकदिवसीय शर्ट क्र. १९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९० – present कर्नाटक
२००३ Scotland
२००० Kent
कारकिर्दी माहिती
Tests ए.सा. प्र.श्रे. लि.अ.
सामने ११२ ३३३ २२८ ४३४
धावा ९४९२ १०५८५ १८२४० १४६७१
फलंदाजीची सरासरी ५६.५० ३९.४९ ५७.०० ४२.२७
शतके/अर्धशतके २४/४८ १२/८१ ४९/९५ २०/१०८
सर्वोच्च धावसंख्या २७० १५३ २७० १५३
चेंडू १२० १८६ ६१७ ४७७
बळी
गोलंदाजीची सरासरी ३९.०० ४२.५० ५४.६० १०५.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/१८ २/४३ २/१६ २/४३
झेल/यष्टीचीत १५३/– १९३/१४ २६८/१ २२७/१७

३ नोव्हेंबर, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


[संपादन] व्यक्तिगत

विजेता पेंढारकर या नागपूर स्थित डॉक्टरशी विवाहबद्ध.

Rahul dravid.jpg

[संपादन] आंतरराष्ट्रीय कारकिर्द

राहुल द्रविडने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात केली. विनोद कांबळीच्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखले. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.

पहिल्या १८ महिन्यांत द्रविडने ५६.७ च्या सरासरीने ९६४ धावा जमवल्या. १९९९च्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजय हजारे आणि सुनील गावसकर यांच्यानंतर असा पराक्रम करण्याची कामगिरी केली. या सामन्यात द्रविडने तब्बल ६५३ मिनिटे किल्ला लढवून १९० आणि नाबाद १०३ धावा काढल्या आणि भारताला तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. धावफलक

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीतील १८० धावांची खेळी आणि व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण बरोबर पाचव्या गड्यासाठीची भागीदारी भारताच्या विजयात अत्यंत मोलाची ठरली. त्या सामन्यात भारताने फॉलो-ऑन मिळाला असतानाही विश्वविजेत्या संघावर विजय मिळवला.

(अपूर्ण)


मागील:
सौरव गांगुली
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
-
पुढील:
महेन्द्रसिंग धोणी


वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये