रावसाहेब दादाराव दानवेपाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रावसाहेब दादाराव दानवेपाटील

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ जालना
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील रावसाहेब दानवेपाटील
पुढील रावसाहेब दानवेपाटील
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील उत्तमसिंह पवार
पुढील रावसाहेब दानवेपाटील
मतदारसंघ जालना

जन्म १८ मार्च, १९५५ (1955-03-18) (वय: ५९)
जालना, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी निर्मलाताई दानवे
अपत्ये १ मुलगा व ३ मुली
निवास जालना
या दिवशी ऑगस्ट २५, २००८
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=316


दानवे यांचा राजकीय प्रवास साडेतीन दशकांचा आहे. मराठवाडय़ात भाजपच्या कोणाही नेत्याचा नसेल असा, तोही निवडणुका जिंकण्याचा दानवे यांचा राजकीय प्रवास आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वापासून राजकीय जीवनात प्रवेश केलेल्या दानवे यांनी १९८०मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली. १९९० व १९९५मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत त्यांनी तो स्वत:च्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे राहिले. सध्या ते बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.


[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]