रायलसीमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताच्या नकाशावर रायलसीमाचे स्थान
तिरुपती येथील तिरुपती बालाजी मंदिर

रायलसीमा (तेलुगू: రాయలసీమ) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे. आंध्र प्रदेशचे अनंतपूर, चित्तूर, कुर्नूलकडप्पा हे चार जिल्हे रायलसीमा प्रदेशात मोडतात. रायलसीमाच्या दक्षिणेस तमिळनाडू, पश्चिमेस कर्नाटक, उत्तरेस तेलंगणा ही राज्ये तर पूर्वेस आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग आहे. एकूण ६७,५२६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेला रायलसीमा प्रदेश भारताच्या अनेक राज्यांपेक्षा आकाराने मोठा आहे.

तटवर्ती आंध्र प्रदेशाच्या तुलनेत रायलसीमा भाग अविकसित व गरीब आहे.