रामभाऊ म्हाळगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी (जन्म : इ.स.१९२१; मृत्यू : इ.स. १९८१) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.