राजेश सिंग अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेजर राजेश सिंग अधिकारी हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. कारगिल युद्ध १९९९ च्या मे व जुलै महिन्यांमधला भारतपाकिस्तान मधला मर्यादित सशस्त्र संघर्ष होता. हे युद्ध काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात झाले होते. युद्धाच्या शेवटी भारताचा विजय झाला.

या युद्धात भारताचे काही सैनिक शहीद झाले. त्यांच्यापैकीच एक म्हणजे मेजर राजेश सिंग अधिकारी होय. मेजर अधिकारी यांना दहा माणसांच्या तीन सैनिकी तुकड्यांचे नेतृत्व करायचे होते. त्या तुकड्यांना घेऊन त्यांना १६,००० फुटांवरच्या एका पाकिस्तानी सेनावासावर ताबा मिळवायचा होता. १६,००० फुटांवर आपल्या पत्नीकडून पत्र मिळणे हे अश्चर्यजनक होते, परंतु मेजर राजेश यांना नुकतेच मोहिमेच्या पूर्वी आपल्या पत्नीकडून पत्र मिळाले होते. एका हातात पहाडी प्रदेशाचा नकाशा, व दुसऱ्या हातात AK-४७ रायफल घेऊन निघता निघता त्यांनी ते पत्र आपल्या खिशात ठेवले व एका सहकाऱ्याला सहजतेने म्हणाले, " मी आपली मोहीम संपल्यावर हे पत्र उद्या शांततेत वाचेन." पण दुर्दैवाने हे पत्र वाचण्याचा योग त्यांच्या आयुष्यात कधीच आला नाही. त्याच रात्री त्यांनी व एका दहा माणसांच्या सशस्त्र तुकडीने पहाडाची चढाई करण्याची सुरुवात केली. परंतु त्यांची चाहूल पाकिस्तानी सैनिकांना झाली व गोळीबारात एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला व ते देशासाठी शहीद झाले. या घटनेमुळे मोहीम रद्द करण्यात आली.

त्याचा पुढच्या दिवशी, १०-१० माणसांच्या ३ तुकड्या नवीन मोहिमेसाठी रवाना झाल्या. मेजर राजेश सिंग अधिकारी हेच या गटाचे नेते होते. ते त्या गटाच्या ३मीटर पुढे होते . त्यांना छातीत गोळी लागलेली असूनही ते पुढे जात राहिले. सेनावास कोसळला, पण अधिकारींचा देह त्या सेनावासापासून २० मीटर लांब पडला. ही घटना झाल्यावर एका आठवड्यांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी, नैनितालमध्ये आणला गेला.