राजीव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव पाटील
जन्म २७ मार्च, इ.स. १९७२ [१]
नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ३० सप्टेंबर, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट जोगवा (इ.स. २००९)
सनई-चौघडे (इ.स. २००८)

राजीव पाटील (२७ मार्च, इ.स. १९७२; नाशिक, महाराष्ट्र - ३० सप्टेंबर, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते.

कारकीर्द[संपादन]

राजीव पाटील मूळचे नाशिकचे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते [२]. नाशकातल्या प्रयोग परिवार या नाट्यसंस्थेच्या नाटकांमधून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली [३]. चित्रपटक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईस गेले. तेथे त्यांनी अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी या नामवंत दिग्दर्शकांकडे साहाय्यक म्हणून काम केले [२].

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग टिप्पणी
इ.स. २००४ सावरखेड एक गाव मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
इ.स. २००८ सनई-चौघडे मराठी दिग्दर्शन
इ.स. पांगिरा मराठी दिग्दर्शन
इ.स. २००९ जोगवा मराठी दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
इ.स. २०१३ ७२ मैल एक प्रवास मराठी दिग्दर्शन
इ.स. २०१३ वंशवेल मराठी दिग्दर्शन

मृत्यू[संपादन]

पाटील यांचे वयाच्या ४०व्या वर्षी ३० सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी मुंबईत हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मूळ गावी - नाशिक येथे - त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले [४].

अखेरच्या दिवसांमध्ये पाटील "वंशवेल" नावाच्या मराठी चित्रपटावर काम करत होते, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शीत झाला. [५].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "जोगवा डायरेक्टर राजीव पाटील नो मोर" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-10-03. ५ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन". Archived from the original on 2016-03-06. २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचं निधन". २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन". Archived from the original on 2013-10-03. २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!".

बाह्य दुवे[संपादन]