राजीव तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३ सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालकशिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत. मराठीसृष्टी या मराठी संकेतस्थळावर राजीव तांबे यांचे लेखन असते.

पुणे शहरात नोव्हेंबर २०१३ मध्ये २५ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन झाले होते. राजीव तांबे त्याचे नियोजित अध्यक्ष होते.

राजीव तांबे
  • हे युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करतात.
  • ते “अभ्यासक्रम समिती”चे सदस्य आहेत.
  • ते “राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समिती”चे सदस्य आहेत.
  • त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपर वाचन केले आहे.
  • “गंमतशाळा” या त्यांच्या अभिनव संकल्पनेची निर्मिती आहे, तशा शाळाही ते चालवतात.
  • त्यांची पुस्तके आणि त्यांची भाषांतरे परदेशामधून प्रकाशितझाली आहेत.
  • त्यांना अनेक राज्य व केंद्र पुरस्कारांनी सन्मानितकेले गेले आहे.

राजीव तांबे यांचे अन्य उपक्रम[संपादन]

  • स्टार माझा” या वाहिनीवर दर शनिवारी पालकांसाठी मुलाखत (थेट प्रक्षेपण)
    • अध्यापन कौशल्य कार्यशाळा, लेखनकौशल्य कार्यशाळा (शिक्षकांसाठी कार्यक्रम)
    • मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांचे प्रश्न आणि पालक (पालकांसाठी कार्यक्रम)
    • मुलांच्या विश्वात (मुलांसाठी कार्यक्रम)
    • यशस्वी होऊ या (मुलांसाठी लेखनकौशल्य कार्यशाळा)
    • वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.[१]

राजीव तांबे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अक्कम बक्कम
  • अजब कथा
  • अशोक आणि अमीन
  • आई आणि बाळ
  • आमची शाळा
  • कोंबडू आणि इतर कथा
  • गबरू आणि इतर कथा
  • गंमत गॅंग
  • गंमत जंमत
  • गंमतशाळा भाग १, २
  • गुरुदक्षिणा
  • गुलाबी सई
  • गुळाची ढेप आणि सरबत
  • ग्रेट मंजू
  • चटकन पटकन वाचन लेखन
  • चंपी मालीश आणि था था था
  • चला चहा पिऊ या आणि इतर कथा
  • चाललो दिल्लीला
  • चॉको बॉम्ब
  • छत्रीची जादूआणि इतर कथा
  • छोटी सी बात - पालकांसाठी मूलमंत्र
  • जंगल जंगल
  • जंगलतोड ? मोडेल खोड !
  • झॅकपॅक शोध आणि इतर कथा
  • दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी
  • देणगी
  • पराक्रमी पिंकू
  • प्यारेदादा
  • प्रिय मुलांनो
  • प्रेमळ भूत
  • बछडा आणि इतर कथा
  • बंटू
  • बंटूू बसला ढगात आणि इतर कथा
  • बंटू लाडोबा
  • बंडूचा टिक टिक मित्र आणि इतर कथा
  • बंडू बडबडे
  • बंडू हिशारोबा
  • बोलक्या गोष्टी
  • मगरू
  • मंजू दि ग्रेट
  • मांजरू आणि इतर कथा
  • मरूर आणि इतर कथा
  • माझी लाडकी पूतना मावशी
  • माझे मराठी निबंध, भाग १, २
  • लोलो फुलली ! तुम्ही फुला
  • विज्ञान गमती सहज सोपे प्रयोग
  • शहाणा माणूस आाणतो पाऊस
  • शाळेतली आई
  • शूर ससोबा
  • शेपटीवाले झाड आणिइतर कथा
  • ससुल्या आणि इतर कथा
  • साहसी पिंकू
  • सु सुटका आणि रंगीत डोंगर
  • होय मीसुद्धा

राजीव तांबे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • कवितासंग्रहाला द.का. बर्वे उत्कृष्ट निर्मिती पुरस्कार, १९८८
  • कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, १९८८-८९
  • कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य परिषद पुरस्कार, १९८९
  • एकांकिकेला बाल रंगभूमीचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार, १९९०
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल ग.ह. पाटील पुरस्कार, १९९२
  • एकांकिकेसाठी अखिील भारतीय मराठी बाल कुमार साहित्य पुरस्कार, १९९३
  • कथासंग्रहासाठी उत्कृष्ट बाल साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार, १९९३
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल, पुणे महानगर पालिकेकडून “विशेष सन्मानित”, १९९५
  • बालचित्रवाणीने निर्मित व प्रसारित केलेल्या “आनंददायी शिक्षण” या कार्यक्रमास, भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार, १९९६
  • कादंबरीलेखनासाठी कोकण मराठी साहित्य पुरस्कार, १९९७
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल, सावाना (सार्वजनिक वाचनालय नाशिक) पुरस्कार, २०००
  • कथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २०००-२००१
  • शैक्षणिक पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००२-२००३
  • शैक्षणिक पुस्तकासाठी आगाशे पुरस्कार, बुलढाणा, २००२
  • शैक्षणिक पुस्तकाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी वा.रा. ढवळे पुरस्कार, २००३
  • कथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००७-२००८
  • पालकांसाठी लिहिलेल्या पुस्तकासाठी वा.अ. रेगे (ठाणे) यांच्या नावाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००९-२०१०
  1. ^ Wayam Magazine (2018-04-24), Rajiv Tambe Speech about Wayam, 2018-07-06 रोजी पाहिले