राजा हरिश्चंद्र (चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| राजा हरिश्चंद्र | |
|---|---|
| निर्मिती वर्ष | १९१३ |
| भाषा | मूक चित्रपट |
| दिग्दर्शन | दादासाहेब फाळके |
| प्रमुख कलाकार | दत्तात्रय दामोदर दाबके |
राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट. मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.[१] हा चित्रपट तेवीस दिवस चालला. देशाच्या इतर भागातही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याचा अनेकांना जाणीव झाली.[२]