राजहंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
BarheadedGoose2

राजहंस (इंग्लिश: goose) हा हंसासारखा दिसणारा पक्षी आहे.

ओळख[संपादन]

हा आकाराने कलहंसापेक्षा लहान असतो तो रंगाने पिवळट राखी असतो .डोक्यावर दोन काळे पट्टे असतात .पंखावर काळ्या रेषा शेपटीचे मूळ आणि टोक पांढरे असते .चोच नारिंगी पिवळी व पाय पिवळे असते .

वितरण[संपादन]

हे हिवाळी पाहुणे असतात .ते उत्तर भागात ते पाकिस्तान आणि काश्मीर ,पूर्वेकडे बांगला देश ते ब्रह्मदेश दक्षिणेकडे चिलका सरोवर ,ओरिसा , गुजरात आणि दख्खन भागात दुर्मिळ तसेच कर्नाटक भागात अल्प संख्येत नियमितपणे आढळतात

निवासस्थान[संपादन]

मोठ्या नद्या ,सरोवर ,धण्याची शेती आणि गवती कुरणे

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली