रणबीर कपूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| रणबीर कपूर | |
|---|---|
| जन्म | सप्टेंबर २०, इ.स. १९८२ |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्द[संपादन]
रणबीर कपूर हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. रणबीर कपूर हा ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा पुत्र आहे. २८ सप्टेंबर, इ.स. १९८२ रोजी जन्मलेल्या रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यूयॉर्कच्या 'लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. इ.स. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'साँवरीया' चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. इ.स. २००९च्या 'वेक अप सिद' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.
चित्रपट[संपादन]
- साँवरीया (इ.स. २००७)
- बचना ए हसीनो (इ.स. २००८)
- लक बाय चान्स (इ.स. २००८)
- वेक अप सिद (इ.स. २००८)
- अजब प्रेम की गजब कहाणी (इ.स. २००९)
- रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द यीअर (इ.स. २००९)
- राजनीती (इ.स. २०१०)
- अनजाना अनजानी (इ.स. २०१०)
- रॉकस्टार (इ.स. २०११)
- बर्फी (इ.स. २०११)